मुंबई: दूध आणि दुग्धजन्य पदार्थ्यांमध्ये होणारी भेसळ या गेल्या काही वर्षांपासून गंभीर होत असलेल्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज दूध व्यावसायिकांसाठी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. ग्राहकांपर्यंत भेसळमुक्त दूध पोहचायला हवं, यासाठी संपूर्ण पुरवठा साखळीसाठी एकसमान अनुपालन व्यवस्था निर्माण करण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याबाबतचे आदेश देत असताना तुकाराम मुंढे यांनी ग्राहकांना आवाहन करत दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबतचीही माहिती दिली आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाच्या निरीक्षणांमध्ये महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत काही गंभीर प्रकारच्या अनियमितता आढळून आल्या आहेत. यामध्ये दूधामध्ये पाण्याची भेसळ, कृत्रिम (Synthetic) दूध तयार करून विक्री, युरिया, डिटर्जेंट, कॉस्टिक सोडा, स्टार्च, ग्लुकोज, मेलामाइन इत्यादी रसायनांचा वापर, Milk Fat व SNF मानकांचे उल्लंघन, Aflatoxin M1 व Antibiotic Residues, शीतसाखळीचे पालन न करणे, विनापरवाना अथवा विनानोंदणी व्यवसाय, चुकीचे लेबलिंग व ग्राहकांची दिशाभूल असे प्रकार समोर आले असल्याचं विभागाने स्पष्ट केलं आहे
दूध खरेदी करताना नागरिकांनी काय करावे?
– सीलबंद पॅक तपासा. – लेबल वाचा. – FSSAI Licence Number तपासा. – उत्पादन दिनांक तपासा. – Best Before तपासा. – संशयास्पद दूध खरेदी करू नका. – कच्चे दूध उकळूनच वापरा. – संशय असल्यास तक्रार करा. – सुरक्षित पॅकेजिंग – कायदेशीर व्यवसाय
दरम्यान, महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकास सुरक्षित दूध, शुद्ध दूध, योग्य लेबलिंग आणि वैज्ञानिक गुणवत्ता अशी अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे, असंही तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे. आधी आपण निरीक्षण, नमुना अहवाल आणि कारवाई अशी प्रक्रिया करत होतो, तर आता जोखीम विश्लेषण, गुप्त माहिती, निरीक्षण, नमुना, प्रयोगशाळा विश्लेषण, ट्रेसेबिलिटी ,पुरवठा साखळी तपास, मूळ स्रोतावर कारवाई अभियोजन अशी प्रक्रिया राबवली जाईल. सुरक्षित दूध हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. भेसळमुक्त दूध व्यवस्था निर्माण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून दूध उत्पादक, प्रक्रिया उद्योग, विक्रेते, ग्राहक आणि समाज या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. महाराष्ट्रात अन्न सुरक्षेची सर्वोच्च मानके प्रस्थापित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन पूर्ण क्षमतेने कार्यरत राहील,” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा