छत्रपती संभाजीनगरमध्ये शिपाई पदाची पोलीस भरती पार पडत आहे.या पोलीस भरतीसाठी १२ हजार २७ विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला आहे.शिपाई पदासाठी होत असलेल्या या परीक्षेसाठी बारावी पास असण्याची अट आहे. या भरतीसाठी फक्त बारावी पासच नाही तर इंजीनियरिंग, एमबीए,बीकॉम, ऍग्री केलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. या विद्यार्थ्यांची बातचीत केली असता त्यांच्यातील काही विद्यार्थी म्हणाले की, ए आय आल्यामुळे इंजिनियर झालेल्या मुलांवर संकट आला आहे. यामुळे नोकरी जात आहे. त्यामुळे सरकारी नोकरी पाहिजे. सरकारी नोकरी असली तर शेतीवर कोणी मुली देत नाही त्यामुळे सरकारी नोकरी पाहिजे. लग्न झालं नाही आपलेच खायचे वांदे आहे तिला कुठून खाऊ घालायचं?सरकारी नोकरी असली की काळा गोरा कसाही असला तरी पोरगी मिळते अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिले आहेत