• Thu. Mar 12th, 2026

    Konkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल

    Konkan Railway: लोकलपाठोपाठ कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं, तेजस एक्सप्रेस सहा तर मांडवी तीन तास विलंबाने; प्रवाशांचे मोठे हाल

    Mandovi Express: काल दादर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली होती. कोकण रेल्वेच्या दोन गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. तेजस एक्सप्रेस 6 तास विलंबाने तर मांडवी एक्सप्रेस तीन तास विलंबाने धावत होती.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. खास प्रतिनिधी मुंबई: लोकलपाठोपाठ लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वक्तशीरपणाही कोलमडला आहे. तेजस एक्स्प्रेसपाठोपाठ आता मांडवी एक्स्प्रेसच्या विलंबामुळे प्रवाशांना स्थानकात वाट पाहावी लागली. बुधवारी तेजस सहा तास आणि गुरुवारी मांडवी एक्स्प्रेस पावणेतीन तास विलंबाने धावल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. एक्स्प्रेस विलंबाने धावत असल्याबाबत प्रवाशांना आगाऊ सूचना मिळत नाही, रेल्वे स्थानकात पोहोचल्यावर विलंबाबाबत सूचना मिळत असल्याने प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडते आहे.

    रात्री दहा वाजता गाडी दाखल

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव मांडवी एक्स्प्रेस सीएसएमटीवरून सकाळी ७.१० वाजता सुटणे अपेक्षित होते. परंतु फलाटावर येण्यासाठीच गाडीला उशीर झाला. त्यामुळे पावणे दहा वाजण्याच्या सुमारास गाडी मडगावच्या दिशेने रवाना झाली. गाडीने सीएसएमटी परिसर ओलांडताच मशीद रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आपत्कालीन साखळी ओढली. त्यामुळे सुमारे १५ मिनिटे गाडी सीएसएमटी ते मशीद दरम्यान खोळंबली. यामुळे एरवी दादर स्थानकात ७.२२ वाजता पोहोचणारी मांडवी एक्स्प्रेस पावणे तीन तास विलंबाने अर्थात सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास दाखल झाली.Maharashtra TimesMumbai Coastal Road: देशातील पहिला ‘म्यूझिकल रोड’ मुंबईमध्ये, कोस्टल रोडवरील प्रवास मनोरंजक होणार; महापालिकेचा नवा प्रकल्प पाहा

    दादरमध्ये शेकडो प्रवासी या गाडीच्या प्रतीक्षेत होते. परंतु रेल्वेकडून नक्की किती वाजता ही गाडी निघेल याबद्दल कोणतीच उद्घोषणा करण्यात येत नव्हती. दादरमधील फलाटावर चहा-पाण्यासाठी कोणताही स्टॉल नाही, स्वच्छतागृह नाही. तसेच बसायला आसनव्यवस्थाही उपलब्ध नाही. प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होईपर्यंत रेल्वे प्रशासन वाट बघत राहणार का, असा प्रश्न मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष, शिरीष देशपांडे यांनी उपस्थित केला.

    Maharashtra TimesVande Metro: लोकल प्रवास वंदे भारत इतका वेगवान! मुंबईत 238 ‘वंदे मेट्रो’ गाड्या, बंद दरवाजे, 12-18 डबे; कधी-किती भाडं?

    दादरला गाडी रद्द

    मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस बुधवारी सहा तास विलंबाने धावली. दुपारी ३.३५ ऐवजी ही गाडी रात्री ९.५७ ला रवाना झाली. प्रशासनाने गाडीची वेळ रात्री नऊ वाजताची केली. परंतु त्यानंतरही तासाभराने गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. परिणामी दादर स्थानकात रात्री ११.३० वाजता पोहोचणारी तेजस दुसऱ्या दिवशी सकाळी १०.१० वाजता पोहोचली. तेजस एक्स्प्रेसमध्ये शयनयान डब्यांची व्यवस्था नसल्याने रात्रभर प्रवाशांना ताटकळत प्रवास करावा लागला. दादर ते सीएसएमटी दरम्यान तेजस एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. यामुळे सीएसएमटीला जाणाऱ्या प्रवाशांना बॅगासह दादरवरून लोकल पकडून सीएसएमटी गाठावे लागले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा