• Sun. Mar 8th, 2026

    अंबरनाथकरांसाठी महत्त्वाची बातमी! महाशिवरात्रीनिमित्त 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग

    अंबरनाथकरांसाठी महत्त्वाची बातमी! महाशिवरात्रीनिमित्त 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद? जाणून घ्या पर्यायी मार्ग

    Ambernath Traffic Diversion : दोन दिवस अंबरनाथ पूर्वेतील हिंदू स्मशानभूमीकडून गोविंद तिर्थ पुलाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल.

    शिवमंदिर अंबरनाथ ठाणे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.वृत्तसेवा, अंबरनाथ: अंबरनाथमधील शिवमंदिर परिसरात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या मोठ्या जत्रौत्सवानिमित्त या भागातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. अंबरनाथ आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेल्या या मंदिराच्या परिसरातील सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद असेल. तसेच १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी दरम्यान वाहतुकीतील हे बदल लागू असतील, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली.

    कोणते रस्ते बंद?
    या काळात वाहने वैभव हॉटेलकडून हिंदू स्मशानभूमीपासून सरळ वडवली सेक्शन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हुतात्मा चौकाकडून मटका चौकातून पुढे जातील. तसेच स्वामी समर्थ चौकाकडून गोविंद तिर्थ पुलामार्गे वैभव हॉटेलकडे जाणाऱ्या तसेच उल्हासनगर कॅम्प पाचमधील कैलास कॉलनीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना स्वामी समर्थ चौक येथे प्रवेश बंद असेल. ती वाहने स्वामी समर्थ चौकातून डाव्या बाजूला वळण घेऊन पुढे रोटरी क्लब वडवली सेक्शन अशी एकतर्फी वाहतूक करून पुढे हिंदु स्मशानभुमी मार्गे वैभव हॉटेलकडे जातील.

    Maharashtra TimesNavi Mumbai Crime : मद्यधुंद अवस्थेत कार दामटवली, वाहनांना जोरदार धडक, कारवर ‘पोलीस’ नावाची पाटी; गाडीचा दरवाजा उघडताच…Video
    अवजड वाहनांना प्रवेश बंद
    तसेच स्वामी समर्थ चौकातून उजव्या बाजूला वळण घेऊन पुढे कानसई मार्गे सुभाष टेकडी रस्त्याने उल्हासनगरला जातील. वैभव हॉटेलकडून अंबरनाथ रेल्वेस्थानकमार्गे मटका चौकापर्यंत येणाऱ्या सर्व अवजड वाहनांना वैभव हॉटेल येथे प्रवेश बंद असेल. या वाहनांनी आनंदनगर एमआयडीसी टी जंक्शन येथून फॉरेस्ट नाका, लादीनाका, मटका चौक मार्गे अंबरनाथ पश्चिम येथून पुढे प्रवास करावा. तर औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही असाच प्रवास करावा लागणार आहे.

    मटका चौकातून पूर्वेकडे जाणाऱ्या जड वाहनांनाही फॉरेस्ट नाकामार्गे वैभव हॉटेल जावे लागेल. तर पूर्वेतून येणाऱ्या हलक्या वाहनांना रोटरी क्लब येथे प्रवेश बंद असेल. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हुतात्मा चौकमार्गे प्रवास करावा लागेल. उल्हासनगरातील वाहने लोकनगरी बसस्थानकाकडून, कैलास कॉलनीकडून येणारी वाहने ओटी सेक्शन, हिललानी पोलीस ठाण्यामार्गे जातील.

    Maharashtra TimesSoham Katre : डोंबिवलीच्या सोहमचा लोकलमधून पडून बळी, वडील ZP मतदानासाठी गावी, आई-भावापासून संध्याकाळपर्यंत लपवलेलं; आता दादाची हात जोडून मागणी
    वाहनतळ व्यवस्था

    या काळात अंबरनाथ पूर्वेतील हिंदू स्मशानभुमी ते गोविंद तीर्थ पुलावर लहान वाहने पार्क होतील. हिंदू स्मशान भूमी बॅरीकेडपासून वाहने आत जातील आणि बाहेर पडतील. तसेच मोठी वाहने लोकनगरी मैदान येथे पार्क होतील

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा