वाशिममध्ये आज एसटी बस पलटी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना घडली तेव्हा बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी आता सुखरुप असल्याची माहिती आहे. काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वाशिम : वाशिममध्ये एसटी बसच्या अपघाताची मोठी दुर्घटना घडली आहे. एसटी बस रस्त्याने जात असताना अचानक बाईक मध्ये आली. त्यामुळे त्या बाईकस्वाराला वाचवण्याच्या गडबडीत एसटी बस पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुदैवाने कुणालाही फार मोठी गंभीर दुखापत झालेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटना घडली तेव्हा एसटी बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. या 37 प्रवाशांपैकी काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
वाशिम जिल्ह्यातील वाशिम–पुसद मार्गावरील सापळी फाटा येथे आज शेगाव ते उमरखेड जाणारी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 14 बीटी 4362 क्रमांकाची बस वाशिम बसस्थानकातून निघाल्यानंतर उमरखेडकडे जात असताना एका बाईक चालकाने अचानक बससमोर बाईक आडवी आणल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.
अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. तर उर्वरित प्रवाशांना दुसऱ्या बसणे पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले आहे.
काळ आला होता पण वेळ नाही
ही घटना अतिशय धक्कादायक होती. एसटी बस थेट पलटी झाली होती. त्यामुळे बसमधील 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. ही बस चालकाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. त्यामुळे काहीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता होती. एसटी थेट पलटी झाली. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बचावकार्यासाठी धाव घेतली. तसेच प्रशासनानेदेखील घटनास्थळी महत्त्वाची भूमिका निभावली. प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने सर्व 37 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर अनेकांच्या मनात काळ आला होता पण वेळ नाही, अशी भावना आली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा