• Sat. Jun 6th, 2026

    Nagpur Crime : बारावीच्या विद्यार्थ्याचा बहिणीच्या मैत्रिणीवर दोघांसह आळीपाळीने अत्याचार, आरोपीच्या पित्याला समजताच हार्ट अटॅक

    Nagpur Crime : बारावीच्या विद्यार्थ्याचा बहिणीच्या मैत्रिणीवर दोघांसह आळीपाळीने अत्याचार, आरोपीच्या पित्याला समजताच हार्ट अटॅक

    नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आला आहे. इयत्ता बारावीत असणाऱ्या अल्पवयीन तरुणाने त्याच्या दोन मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन आरोपीचा प्रताप समजल्यानंतर त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नागपूर : नागपूरमधील नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मुलाने आणि त्याच्या दोन मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एका तरुणाला अटक केली आहे. तर दोन मुलं ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतः अल्पवयीन असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी ही मुख्य आरोपीच्या बहिणीची मैत्रीण होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिला अनेकदा भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, पीडितेने त्याला वारंवार नकार दिला. असे असतानाही आरोपीने तिला मेसेज करणे सुरूच ठेवले. अखेर ४ फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडितेशी संवाद साधून तिला आपल्या घरी बोलावले.

    पीडित मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथे आरोपी आणि त्याचे दोन मित्र आधीच उपस्थित होते. मुख्य आरोपीने मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य घडत असताना बाहेर असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन आरोपींनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला.

    या घटनेनंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा भेटायला बोलावले. मात्र, या जाचाला कंटाळून आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेने अखेर धाडस दाखवून आपल्या कुटुंबाला आपबिती सांगितली. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    गुन्ह्याचा कुटुंबावरही परिणाम

    या घटनेचे पडसाद आरोपींच्या कुटुंबावरही उमटले आहेत. मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी असून, मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता. मात्र, पोलीस कोठडीत असल्याने त्याला परीक्षा देता आली नाही. आपल्या मुलाने अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याचे समजताच आरोपीच्या वडिलांना धक्का बसला असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून, अत्याचार करतानाचा व्हिडिओ खरोखर काढला होता का आणि तो कुठे शेअर केला आहे का? याचा तांत्रिक तपास सध्या सुरू आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा