जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. खडसे यांनी पोलीस अधिकारी आणि एका बड्या मंत्र्यांबाबत अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
निलेश पाटील, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्यांना अश्लील भाषेचा वापर करुन अवमान केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांनी एका बड्या मंत्र्यांबाबतही पोलीस ठाण्यात अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप देखील असल्याची मिळत आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सावदा पोलीस ठाण्यामध्ये एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्च शब्दात अरेरावी केल्याचा आरोप आहे.
नेमकं प्रकरण काय?
एकनाथ खडसे हे बुधवारी सावदा पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांनी पोलिसांना रावेरच्या तासखेडा येथील गौणखाणीचा गुन्हा का दाखल केला नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकास तुम्ही * खाता का? अशा अपमानास्पद शब्दात जाब विचारल्याचा आरोप आहे. यावेळी शाब्दिक वाद झाल्यानंतर खडसेंनी अर्वाच्य भाषा वापरल्याचा आरोप आहे. तसेच तुमच्यावर अँटी करप्शनचा ट्रॅप लावतो, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे.
एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया काय?
या घटनेवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शासनाच्या मुरुमाची मोठ्या प्रमाणात चोरी होते. “त्याबद्दल मी त्यांना अडीच महिने कशी चौकशी होते? असा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, मला वाटेल तोपर्यंत मी चौकशी करेन. मला काय तुमचं बंधन आहे का? म्हणे त्या डिपार्टमेंटवाल्यांनी पैसे खाल्ले. मग मी म्हटलं, त्यांनी पैसे खाल्ले मग तू काय * खाल्ला? तुला काम दिलं आहे ना? मग नंतर मी लगेच दोन मिनिटात सांगितलं की, माझा चुकीचा शब्द गेला. मी तुझी माफी मागतो. आता शेवटचा शब्द आहे, तुम्ही जे हफ्ते घेतात त्या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे जावं लागेल आणि नवी कारवाई करावी लागेल”, अशी भूमिका एकनाथ खडसे यांनी या घटनेवर दिली आहे.
“चाळीस ते पन्नास हजार ब्रास गौण खनिज चोरीला गेली असल्याची एका व्यक्तीने तक्रार दिलेली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये मी गौण खनिजाचा प्रश्न अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. तक्रार केल्यामुळे तेथील जो पोलीस अधिकारी आहे त्याची जीवावर आली. माझ्याने अपशब्द वापरला गेला. त्याबद्दल मी त्याची माफी देखील मागितली आहे. हप्ते घेतात म्हणून अँटीकरप्शनकडे जावं लागेल आणि कारवाई करावी लागेल असं त्या ठिकाणी मी बोललो. सावदा परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की कुठे दोन नंबरचे धंदे सुरू आहे त्याचे फोटो मला पाठवा आणि मी रोज मीडियासमोर ते दाखवेन”, असंदेखील एकनाथ खडसे म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा