• Fri. Mar 6th, 2026
    मैत्रिणीशी अनैतिक संबंधाचा संशय, व्हिडिओ पाहून पित्त खवळलं, नवी मुंबईतील हवालदाराने साताऱ्यात तरुणाला संपवलं

    Satara Murder : मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरूणाची हत्या केल्याची कबुली संशयित तरुणाने दिली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : खंडाळा तालुक्यातील सुखेड गावच्या हद्दीतील विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि लोणंद पोलिसांनी ७२ तासात या प्रकरणाचे गूढ उकलत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरूणाची हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

    खंडाळा तालुक्यातील सुखेड गावातील एका विहिरीत २५ ते ३० वर्षे वयाच्या अनोळखी तरूणाचा अर्धवट जळालेला मृतदेह हातपाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासात मृताचे सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) असल्याचे निष्पन्न झाले. घातपाताची घटना असल्याने लोणंद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, सातारा एलसीबीचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, लोणंदचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या पथकाने सलग तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला.
    Maharashtra TimesMumbai Crime : जुहू बीचवरील बॉडीचं गूढ CCTV मुळे उकललं; मित्राच्या बायकोशी लफडं, 30 वर्षीय तरुणासोबत काय घडलं?
    सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एका संशयित कारचा शोध लावला. सलग तीन दिवसांच्या अहोरात्र तपासा संशयितांनी तरूणाची कळंबोली येथे नियोजनपूर्वक कट रचून हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी बंडू बापू भिसे (रा. कळंबोली, ता. पनवेल, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (रा. साखरवाडी, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (मूळ रा. होळ, ता. फलटण, हल्ली रा. पारी चौक, पुणे) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. रायकर मळा, धायरी, पुणे) या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

    Mumbai News | CSMT – Goregaon local train ३ महिने बंद राहणार, लाखो प्रवासी चिंतेत

    संशयित आरोपींनी सोमनाथ बोबडे याला कळंबोली येथे जबरदस्तीने होंडा सिटी कारमध्ये (MH -12 DY 8846) बसवून दोरीने हातपाय बांधले. गाडीतच त्याचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह सुखेड येथे आणून पेट्रोल टाकून पेटवला. अर्धवट जळालेला तो मृतदेह विहिरीत टाकला. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी विहिरीत मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर ७२ तासात हत्येचा छडा लावून चौघांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं.
    Maharashtra TimesSoham Katre : डोंबिवलीच्या सोहमचा लोकलमधून पडून बळी, वडील ZP मतदानासाठी गावी, आई-भावापासून संध्याकाळपर्यंत लपवलेलं; आता दादाची हात जोडून मागणी
    मुख्य आरोपी बंडू बापू भिसे (वय ४९) हा नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात हवालदार पदावर कार्यरत आहे. तो मूळचा फलटण तालुक्यातील दुधेबावी गावचा आहे. भिसे याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. मृत सोमनाथ बोबडे याचेसुद्धा त्या महिलेशी संबंध जुळल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. भिसे याचे काही फोटो व व्हिडीओ बोबडेच्या हाती लागल्याने तो भिसेला ब्लॅकमेल करत होता. या त्रासाला कंटाळून भिसे याने सोमनाथ बोबडेचा काटा काढण्याचा कट रचला.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा