• Thu. Mar 12th, 2026

    Thane Ring Metro: रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुलभ, अंतर्गत भागात 22 भूयारी आणि उन्नत स्थानकं; कुठे-कसा असणार मार्ग?

    Thane Ring Metro: रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांचा प्रवास सुलभ, अंतर्गत भागात 22 भूयारी आणि उन्नत स्थानकं; कुठे-कसा असणार मार्ग?

    Thane Internal Ring Metro: ठाण्याच्या अंतर्गत भागांत इन्ट्रा सिटी मेट्रो मार्गिका उभारण्याचं काम सुरू आहे. यासाठी महामेट्रोने निविदा काढल्या आहेत. 22 पैकी 8 स्थानकांच्या बांधकामांसाठी ही निविदा आहे.

    ठाणे: ठाणे शहराच्या अंतर्गत धावणारी ठाणे रिंग मेट्रोबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महामेट्रोने (MahaMetro) या प्रकल्पासाठी निविदा जाहीर केली आहे. या मेट्रो मार्गावरील आठ स्थानकांच्या बांधकामाबद्दल ही निविदा काढली आहे. हा मार्ग एकूण 29 किमी लांब असून, या मार्गिकेवर एकूण 22 स्थानकं असतील. ही स्थानकं ठाणे शहराच्या अंतर्गत भागांत असल्यामुळे शहरात वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

    कुठे असतील स्थानकं?

    या 29 किमी लांब वर्तुळाकार मार्गासाठी एकूण 12,200.10 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ही आठ स्थानकं ठाण्यामधील मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पाटीलपाडा, ठाणे जंक्शन आणि नवीन ठाणे असे असतील. या पैकी ठाणे जंक्शन आणि ठाणे आणि न्यू ठाणे ही स्थानकं भूमिगत (Underground Metro Stations) असतील. तसेच उर्वरित सहा स्थानकं उन्नत असतील.Maharashtra TimesThird Mumbai: मुंबईपेक्षा तिप्पट मोठं शहर, अटल सेतू-विमानतळाला जोडणार; ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासाबाबत मंत्रीमंडळात महत्त्वाचा निर्णय

    या मेट्रोमध्ये दररोज 647,000 प्रवासी संख्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाण्यात वाघबीळ, विजय नगरी, डोंगरीपाडा, मानपाडा, गांधीनगर, वागळे इस्टेट (Wagle Estate), कोळशेत, हिरानंदानी इस्टेट अशा सर्वाधिक गर्दीच्या ठिकाणांवरून ही मेट्रो जाणार आहे. या वर्तुळाकार मेट्रोचा ठाणेकरांना मोठा फायदा होणार आहे.

    कधी होणार काम पूर्ण?

    या मेट्रोचं काम येत्या पावसाळ्यानंतर सुरु होण्याची अपेक्षा आहे. काम सुरू होताच भुयारी स्थानकांचं काम पूर्ण करायला 5 वर्ष तर उन्नत स्थानकांचं काम पूर्ण करण्यासाठी 2.5 वर्षांचा कालावधी लागणार आहे. या भुयारी स्थानकांसाठी 223.70 कोटींचा खर्च होणार असून, उर्वरित स्थानकांसाठी 228.44 कोटी लागणार आहेत. 2029 पर्यंत ही संपूर्ण मेट्रो मार्गिका नागरिकांसाठी सुरु करण्याचं उद्दिष्ट आहे.

    भिवंडीकरांची डोकेदुखी संपणार ठाणे-भिवंडी मेट्रो कधी सुरू होणार ? आमदार रईस शेख यांनी दिलं उत्तर

    या इन्ट्रा सिटी मार्गिकेमुळे ठाणेकरांना मेट्रो स्थानक, रेल्वे आणि बस स्थानकांशी थेट जोडणी मिळणार आहे. मुंबई मेट्रो लाईन 4 (Mumbai Metro 4) आणि मुंबई मेट्रो 4अ जी गायमुख-वडाळा मार्गावर धावणार आहे, त्या मार्गिकेला जोडणार आहे. शिवाय ठाण्यापासून पुढे भिवंडीला जाणाऱ्या मेट्रो लाईन 5 ला जोडणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा