• Sat. Mar 7th, 2026
    Palghar Crime: भारतीय बांगलादेशींना ‘ओळख’ देणारा जेरबंद; विरारमधून 350 बनावट रेशन कार्ड हस्तगत

    Fake Ration Card Case: मुंबईमध्ये सर्वच पोलिस ठाणी आणि विशेष शाखांच्या वतीने शहरात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची जोरदार मोहीम सुरू आहे.

    fake ration card(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मुंबईमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न गंभीर बनला असून, त्यांना भारतीय ओळख देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करण्याचे प्रमाणही वाढले आहे. मुंबई पोलिसांनी याविरोधात धडक मोहीम हाती घेऊन बांगलादेशींना बोगस रेशन कार्ड पुरवणाऱ्या तरुणाला विरार येथून नुकतीच अटक केली. त्याच्याकडून तब्बल ३५० रेशन कार्ड हस्तगत करण्यात आली आहेत.

    दिंडोशी पोलिसांना काही नागरिकांकडे बनावट भारतीय ओळखपत्र, रेशनकार्ड तसेच इतर कागदपत्रे सापडली. ही रेशनकार्ड त्यांनी कुठून आणली याचा कसून तपास केला असता, त्याचे धागेदोरे विरारपर्यंत पोहोचले.

    Maharashtra TimesGood News! महाराष्ट्रात लवकरच महाभरती; 70 हजार पदांसाठी प्रक्रिया सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
    सुजल दयाळ (२१) हा तरुण खऱ्या रेशनकार्डप्रमाणे हुबेहूब बनावट रेशनकार्ड बनवून देत असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. त्यानुसार दिंडोशी पोलिसांनी सुजलच्या विरार येथील घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेतले. या छाप्यामध्ये ३५० बनावट रेशनकार्ड, प्रिंटर, लॅपटॉप आणि इतर साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी सुजलला अटक केली असून, न्यायालयाने त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

    मोठी टोळी असल्याचा संशय
    मोठ्या प्रमाणात बनावट रेशनकार्ड सापडल्याने यामध्ये वेगवेगळ्या एजंटांची मोठे टोळी सक्रिय असावी, असा पोलिसांना संशय आहे. सुजलने शेकडो जणांना बनावट रेशनकार्ड उपलब्ध करून दिली आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेली रेशनकार्ड मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मिरा-भाईंदर, वसई, नालासोपारा आणि विरार येथील पत्त्यांची आहेत.

    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल सोबतीला

    वडिलांपासूनचा ‘उद्योग’
    सुजलच्या वडिलांपासूनच बनावट रेशन कार्ड बनवण्याचा हा धंदा सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर सुजलने हे काम पुढे सुरू ठेवले. वडिलांच्या वेळी मर्यादित स्वरूपात असलेल्या धंद्याची व्याप्ती त्याने वाढवल्याचे पोलिसांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा