टाकवे बुद्रुक गणातून प्राची गायकवाड यांनी मिळवलेला विजय हा या निवडणुकीतील सर्वात मोठा ठरला आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवाराचा ७,९२४ मतांनी पराभव केला.
भावनिक लाट अन् स्थानिक रणनीती यशस्वी
निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. या धक्कादायक घटनेमुळे पक्षाने अधिकृतरीत्या कोणताही मोठा प्रचार केला नव्हता. मात्र, स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करत ग्राऊंड लेव्हलवर बांधणी केली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच राष्ट्रवादीने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.
भाजपचा बालेकिल्ला ढासळला
मावळ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, अनेक विद्यमान जागा राष्ट्रवादीने खेचून आणल्याने भाजपला आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. अटीतटीच्या लढतीतही राष्ट्रवादीच सरस: कार्ला आणि इंदुरी गणात भाजपने जोरदार टफ दिला होता, मात्र शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी घेतलेली झेप भाजपला रोखता आली नाही.
Parbhani ZP Election Result : परभणीत भाजपचा ‘महाविजय’; राष्ट्रवादी अजित पवार गटाची जोरदार मुसंडी, महाविकास आघाडीची वाताहत!
पंचायत समिती गणात अजित पवार गटाची सरशी
चायत समिती गणातील निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखत विविध गटांत विजय मिळवला आहे. टाकवे बुद्रुक गटातून प्राची गायकवाड यांनी ११,६८१ मते मिळवत अश्विनी कोंडे (३,७५७) यांचा पराभव केला. नाणे गटात आशा मोरमारे यांनी १०,०५७ मते मिळवत संगिता आढारी (३,५००) यांना हरवले. वराळे गटातून राजेंद्र कडलक (९,६५६) यांनी रवि शेटे (६,४२०) यांचा पराभव केला. इंदुरी गटात दिलीप ढोरे (७,०७३) यांनी श्रीकृष्ण भेगडे (५,७७५) यांच्यावर विजय मिळवला, तर खडकाळे गटातून समीर जाधव (९,०५९) यांनी प्रकाश गायकवाड (५,५२४) यांचा पराभव केला.
आगामी विधानसभेची नांदी?
मावळ पंचायत समितीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचा एकतर्फी झेंडा फडकला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर ही निवडणूक पक्षाच्या अस्तित्वाची मानली जात होती. मात्र, मतदारांनी दिलेल्या या कौलामुळे मावळमधील भाजपची पकड पूर्णपणे ढिली झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने मोठी आघाडी घेतल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
