लातूर जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने मसंडी मारत तब्बल 23 जागांवर विजय मिळवला आहे. पण तरीही लातूर जिल्हा परिषदेत महायुतीच सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. लातूर जिल्हा परिषदेच्या सर्व 59 जागांचा निकाल समोर आला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यातील 12 जिल्हा परिषदेसाठी आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली आहे. लातूर जिल्ह्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपला मागच्यावेळी स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र यावेळी भाजपच्या जागा कामी झाल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुसंडी मिळालेली पहायला मिळत आहे. जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने युती केली होती. मागील निवडणुकीत काँग्रेसकडे 15 जागा होत्या. यावेळी तब्बल 23 जागा जिंकत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला आहे. गेल्या वेळेपेक्षा आठ जागांची वाढ काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे. आमदार अमित देशमुख यांनी एकहाती लढत देत केवळ काँग्रेसचे अस्तित्व टिकवले नाही, तर पक्षाच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ केली आहे. याचबरोबर लातूर पंचायत समितीवर काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही विजयी वाटचाल लक्षणीय ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकूण 12 जागांवर विजय मिळवला आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची तीन तालुक्यांमध्ये युती झाली होती. त्यामध्ये उदगीर, जळकोट आणि अहमदपूर तालुक्यांचा समावेश होता. उर्वरित ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती पाहायला मिळाल्या.
मनसेचे जिल्हा परिषदेत मनसेने खाते खोलले
कधी नव्हे ते मनसेने जिल्हा परिषदेत एक तर पंचायत समितीमध्ये दोन जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेने हा विजय मिळवत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत प्रवेश केला आहे. शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या अनेक वर्षांच्या कार्याला मतदारांनी पसंती दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.
भाजपची पिछेहाट स्पष्ट
मागील वेळी भारतीय जनता पक्षाने स्वबळावर 36 जागा जिंकत काँग्रेसकडून सत्ता खेचून घेतली होती. मात्र यावेळी भाजपच्या जागांमध्ये मोठी घट झाली आहे. भाजपच्या तब्बल अर्ध्या जागा कमी झाल्या असून केवळ 18 जागांवरच भाजपला विजय मिळवता आला आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरूमकर यांनी आपापल्या भागात मेहनत घेतली. मात्र काँग्रेसने जोरदार मुसंडी मारल्यामुळे भाजपाची पिछेहाट झाल्याचे चित्र दिसून आले आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा