• Mon. Jun 15th, 2026

    राज्यात पेट्रोलची दरवाढ

    ByMH LIVE NEWS

    Mar 20, 2026
    राज्यात पेट्रोलची दरवाढ

    जागतिक बाजारात कच्चा तेल्याच्या किंमतीत शुक्रवारी मोठी घसरण दिसून आली. पण देशातील महागनगरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ दिसून आली. ही दरवाढ किरकोळ असली तरी त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. गेल्या चार वर्षांपासून देशातील इंधनाच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. पण आखाती देशातील युद्धाचा मोठा फटका कच्चा तेलाच्या पुरवठ्यावर होत आहे. देशात घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती या महिन्यात 60 रुपयांनी वाढल्या. तर त्या पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची भीतीही नागरिकांमध्ये आहे. आज पुणे, सोलापूरसह अनेक शहरात पेट्रोलच्या किंमतीत वाढ दिसून आली.

    पॉवर आणि स्पीड पेट्रोल दरात वाढ

    सोलापुरात साध्या पेट्रोलचे दर स्थिर आहेत. मात्र स्पीड पेट्रोलच्या दरात 2 रुपयांची वाढ दिसून आली. सोलापुरातील पेट्रोल पंपावर साधे पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. साधे पेट्रोल 104 रूपये तर स्पीड पेट्रोल 111 वरून 113 रूपये झाले. साधं पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत त्याच आहेत मात्र स्पीड पेट्रोल दोन रुपयांनी वाढले. पुण्यातही अशीच दरवाढ झाली आहे. आमच्याकडे पेट्रोलचा साठा स्थिर आहे कोणताही तुटवडा नाही मात्र काही ग्राहक गर्दी करत असल्याचे पेट्रोलपंप चालकांचे म्हणणे आहे.

    कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ

    आखाती देशात कच्चे तेल गुरूवारी 119 डॉलर प्रति बॅरलपेक्षा जवळपास 14 डॉलर प्रति बॅरलने स्वस्त झाले. तर दुसरीकडे अमेरिकन क्रूड डब्ल्यूटीआयचा भाव गुरुवारी 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा 8 डॉलर प्रति बॅरलपर्यंत घसरला. युद्ध सुरू असताना भाव घसरल्याने कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे एक वक्तव्य आले आहे. त्यानुसार, इराण आता कमकुवत झाला आहे. त्याचाकडे युद्ध लढण्यासाठी रसद नाही. त्यामुळे हे युद्ध लवकरच संपणार असा दावा त्यांनी केला होता. तेव्हापासून किंमतींवर परिणाम दिसून येत आहे.

    चार महानगरातील भाव काय

    IOCL च्या आकडेवारीनुसार, चार महानगरांपैकी तीन महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती क्रमशः 94.77 रुपये आणि 87.67 रुपये प्रति लिटर आहेत. तर कोलकत्तामध्ये पेट्रोलचा भाव सर्वाधिक 105.41 रुपये इतका आहे. तर डिझेलची किंमत 92.02 रुपये प्रति लिटर इतकी आहे. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलची किंमत क्रमशः 103.54 रुपये आणि 90.03 रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईत पेट्रोल 101.06 रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत 92.61 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed