नेमंक प्रकरण काय?
पुणे जिल्ह्यातील मरकळ तालुका खेड येथील अथर्व गणेश लोखंडे याच्या हत्याच्या 2 दिवसाआधी त्याचा मित्र व सध्या संशयित आरोपी असलेला किसन उर्फ कृष्णा राजाराम धोत्रे याच्याकडे काही पैशांचा व्यवहारासाठी आला होता. मात्र त्यांचं क्षुल्लक कारणवारुन फिस्कटलं आणि कारमध्ये संशयित आरोपी किसन उर्फ कृष्णा राजाराम धोत्रे याने अथर्व लोखंडे याला 10 लाख रुपये देण्याचं सांगून पेवा तालुका मंठा येथे आणलं. तेथे 2 साथीदारांच्या मदतीने दोरीने गळा आवळून त्याचा खून केला.
हे सर्व आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी अथर्वचा गळा आवळून हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पेवा गावातील ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीत अथर्वचा फेकून दिला. दुसऱ्या दिवशी ही बाब गावकऱ्यांच्या व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. यावेळी एकच खळबळ गावात उडाली. विहिरीत एक अनोळखी तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण परीसरात पसरली. सदरची माहिती मंठा पोलीस ठाण्याला देण्यात आली. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. मृताच्या अंगावर पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट असून दोरीने हातपाय बांधलेले होते. तसेच पोटाजवळ दगड बांधलेला आढळून आला. यावरून अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झालं.
आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल
पेवा गावचे पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून 5 फेब्रुवारी 2026 रोजी मंठा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मंठा पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान अनोळखी मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. पुढील तपासात आरोपी किसन उर्फ कृष्णा राजाराम धोजे (वय 35, व्यवसाय चालक, रा. आडगाव तांडा, ता. जिंतूर, जि. परभणी, सध्या राहणार काळजेवाडी, चांहोर्ली खुर्द, ता. हवेली, जि. पुणे) यास ताब्यात घेण्यात आलं. चौकशीत आरोपीने पैसे देण्याघेण्याच्या कारणावरून मृत अथर्व यास 10 लाख रुपये देण्याचा बहाणा करून कारने पेवा शिवारात आणले. तेथे आरोपी व त्याचे दोन नातेवाईक सहकारी यांनी दोरीच्या साहाय्याने गळा आवळून अथर्वची हत्या केली.मृतदेहाचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेवा शिवारातील विहिरीत टाकल्याची कबुली आरोपीने दिली. या प्रकरणातील दुसरा आरोपी कर्नाटक राज्यात पळून गेला होता. त्याला ही मंठा पोलीस पथकाने ताब्यात घेतला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास फौजदार संतोष माळगे व पोलीस अंमलदार संतोष बनकर करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक जालना, अप्पर पोलीस अधीक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली व आरोपींना ताब्यात घेतलं. मात्र, जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून गुन्हेगारांनी डोके वर काढलं आहे.