• Mon. Mar 9th, 2026

    मुंबईत भर दिवसा गोळीबाराचा थरार,महाराष्ट्राची राजधानी हादरली

    ByMH LIVE NEWS

    Feb 11, 2026
    मुंबईत भर दिवसा गोळीबाराचा थरार,महाराष्ट्राची राजधानी हादरली
    मुंबई 
    महाराष्ट्राची राजधानी आज गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. मुंबईत गोवंडी येथे शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत एका 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर हल्ला करणारी व्यक्ती पळून गेली आहे. तर दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरु केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे. मुंबई सारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारची गोळीबाराची घटना घडल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पण मुंबईत गोळीबाराच्या घटना सातत्याने समोर येत आहे.नुकतंच काही दिवसांपूर्वी बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार झाला होता. अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना याआधी घडली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांचीदेखील गोळीबार करुन हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. पण आज शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेली घटना ही वेगळी असल्याची माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत मंगळवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तरुणीवर गोळीबार करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. वैयक्तिक वादातून ही घटना झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. या घटनेची सध्या परिसरातील नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.

    तरुणीवर गोळी कुणी झाडली? मोठी माहिती समोर

    मृतक तरुणीवर त्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेने गोळी झाडून ठार केल्याची माहिती आहे. ही तरुणी आपल्या पतीसोबत जवळीक करीत असल्याचा महिलेला संशय होता. त्यातून दोन दिवसांपूर्वी दोघींमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्याचाच राग काढण्यासाठी हे कृत्य केल्याचे म्हटले जात आहे. गोळीबार करणारी महिला फरार असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे.

    आरोपी महिलेकडे गोळीबार करण्यासाठी पिस्तूल कुठून मिळाली? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यामागचं कारण पोलीस शोधून काढतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान, गोळी लागल्यानंतर तरुणी बरेच अंतर चालून गेल्याने नेमकं घटनास्थळ संध्याकाळपर्यंत पोलिसांना कळत नव्हतं. पोलीस आता या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *