Ajit Pawar Plane Crash Site Video : बारामती विमानतळापासून काही अंतरावर पडलेला अजित पवार यांच्या विमानाचा सांगाडा आणि छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले
अजित पवार यांचं अपघाती निधन
२८ जानेवारी रोजी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला जात असताना अजित पवार यांचे विमान अपघातग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून सविस्तर तपास सुरु आहे.
NCP Reunion : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला थेट मोदींचा हिरवा कंदील? खळबळजनक दावे, सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपदाची चर्चा
बारामती विमानतळापासून काही अंतरावर पडलेला अजित पवार यांच्या विमानाचा सांगाडा आणि छिन्नविच्छिन्न झालेले मृतदेह पाहून अनेकांना अश्रू आवरणं कठीण झालं होतं. अजित दादांची शेवटची आठवण म्हणून एक जळालेला कागद उडत आपल्याजवळ आल्याचं सांगणारा व्हिडिओ कल्याणी पारखे नरुते नावाच्या महिलेने शेअर केला आहे. अजूनही विश्वास बसत नाही, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
Ajit Pawar यांच्या मृत्यूबाबत Chhagan Bhujbal यांना संशय, ‘इथे विमान आलंस कसं काय?’
काय आहे व्हिडिओ?
‘हीच ती जागा जिथे दादा सोडून गेले… दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली आणि मन एकदम गहिवरुन आलं. एवढं सगळं दिसतंय, तरी विश्वास बसत नाहीये, की दादा आता आपल्यात नाही राहिले’ असं कॅप्शन त्यांनी व्हिडिओला दिलं आहे.
Hemalata Patil : अजित दादांनी 27 तारखेला मला शब्द दिलेला, त्यांचं निधन होताच घाणेरडं राजकारण, NCP नेत्याचा गंभीर आरोप
यात कल्याणी यांनी दाखवलेल्या कागदपत्रांमध्ये सहवैमानिक शांभवी पाठक यांचे नाव दिसत आहे. विमानाशी संबंधित दस्ताऐवजांवर शांभवी यांची स्वाक्षरी आहे. या व्हिडिओला एका दिवसात दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर जवळपास १२०० जणांनी कमेंटच्या माध्यमातून आपल्या भावना मांडल्या आहेत. व्हिडिओ शेअर करणाऱ्या कल्याणी पारखे मूळ नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असून आता त्यांचं सासर बारामती आहे.
Jay Pawar : Dad काश वेळ थांबली असती, तर मी… जय पवार यांची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, अजितदादांसोबतचा फोटो शेअर करत लिहिलं…
