• Tue. Sep 22nd, 2026

IIT Bombay Student Death: IIT मुंबईचा विध्यार्थी साहिल वाकोडे याच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण समोर आले आहे. साहिलच्या मृत्यूनंतर कॅम्पसमध्ये तणाव पाहायला मिळाला. साहिलच्या कुटुंबीयांनी निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत. प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्यावर कुटुंबाने आरोप केले आहे. त्यांच्यावर FIR दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहे. तर दुसरीकडे प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्या समर्थनार्थ आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मैदानात उतरले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
IIT मुंबईचा विध्यार्थी साहिल वाकोडे याने १८ सेप्टेंबरला आत्महत्या केली. साहिलकडे परीक्षेदरम्यान मोबाइल असल्याचे प्रकरण समोर आले होते. त्यावेळी प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला हे त्या परीक्षेचे निरीक्षक होते. साहिलच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाने प्राध्यापक दुल्ला आणि अधिकाऱ्यांवर मानसिक छळ व जातीय भेदभावाचे आरोप केले आहेत. या तक्रारीवरून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आणि SC/ST कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. साहिलचे कुटुंब निष्पक्ष चौकशीची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे प्राध्यापक सूर्यनारायण दुल्ला यांच्या समर्थनार्थ आयआयटी मुंबईचे प्राध्यापक समोर आले आहेत. जवळपास ७५० शिक्षक त्यांच्या समर्थनार्थ निर्दर्शने केली आहेत.

काय घडलं नेमकं?

साहिल वाकोडे याने १८ सप्टेंबरला आत्महत्या केली. आयआयटी मुंबईमध्ये साहिल हा बीटेकच्या दुसऱ्या वर्षाचा विध्यार्थी होता. त्याच्या मृत्यूपूर्वी साहिल हा मध्य-सत्र परीक्षा देत होता. १८ सप्टेंबरला ११ ते दुपारी १ च्या वेळेत झालेल्या परीक्षेदरम्यान, प्रोफेसर दुल्ला यांनी साहिलला परवानगीशिवाय स्मार्टफोन वापरतांना पहिले. संस्थेनुसार साहिलने परीक्षेची प्रश्नपत्रिका एका एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करून उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न केला. साहिलच्या मृत्यनंतर त्याच्या कुटुंबाने प्राध्यापक दुल्लावर आणि अधिकाऱ्यांवर मानसिक छळ व जातीय भेदभावाचे आरोप केलेत. या आरोपानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध FIR दाखल केली. आता आयआयटी बॉम्बेचे प्राध्यापक दुल्ला यांच्या समर्थनार्थ समोर आले आहे.

Maharashtra TimesChandrashekhar Bawankule : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे केंद्रीय सचिवांकडून कौतुक, ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात

निवेदनात फॅकल्टी फोरमने काय म्हटले आहे?

आयआयटी मुंबई फॅकल्टी फोरमने म्हटले की, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीला दोषी ठरवणे अन्याकारक आहे. त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, फॅकल्टी फोरमने दुल्ला यांना संस्थेतून निलंबित करण्यात आलेले नाही आहे. साहिलच्या मृत्यूची चौकशी स्वतंत्र आणि निष्पक्ष करता यावी यासाठी त्यांना डीन या पदावरून तात्पुरते दूर करण्यात आले आहे. ते अजूनही आयआयटी मुंबईचे प्राध्यापक म्हणून कायम आहेत. आयआयटी मुंबईने स्पष्ट केले आहे की, दुल्ला हे ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत राहतील. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

फॅकल्टी फोरमने आपल्या निवेदनात साहिल वाकोडेंच्या मृत्यूवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. फोरमने म्हटले आहे की, एका तरुण विद्यार्थ्याचा मृत्यू अत्यंत दुःखद आहे आणि कुटुंब तसेच संपूर्ण कॅम्पसचे दुःख समजून घेणे महत्त्वाचे आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत प्राध्यापक दुल्ला यांच्याबद्दल कोणताही अंतिम निष्कर्ष काढू नये असे फोरमने म्हटले आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूवर सहानुभूती व्यक्त करणे आणि न्यायाची मागणी करणे आवश्यक असले तरी, चौकशीत सहभागी असलेल्यांसाठीही निष्पक्षता राखली पाहिजे. या संपूर्ण प्रकरणात या दोन गोष्टी विचारात घेण्याची गरज असल्याचे फॅकल्टी फोरमने अधोरेखित केले आहे.

फॅकल्टी फोरमनुसार, परीक्षेदरम्यान दुल्ला यांची कृती संस्थेच्या सिनेटने मंजूर केलेल्या नियमांनुसार आणि कार्यपद्धतीनुसार होती. त्यांनी परीक्षेदरम्यान कोर्स इन्स्ट्रक्टर आणि पर्यवेक्षक म्हणून काम केले आणि आपली अधिकृत कर्तव्ये पार पाडली.

वैष्णवी कामडी

लेखकाबद्दलवैष्णवी कामडीवैष्णवी कामडी महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२६ पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. देशातील राजकीय घडामोडी, क्राइम आणि सरकारी निर्णयांसह विदेशातील युद्ध, मोठ्या राजकीय घडामोडी आणि परराष्ट्र धोरणांशी संबंधित बातम्या अतिशय सोप्या भाषेत लिहिणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी त्या नवराष्ट्र या मराठी वेबसाईटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होत्या. या काळात त्यांनी गुन्हे आणि विविध क्षेत्रात वार्तांकन केले आहे. कंटेंट रायटिंग क्षेत्रात त्यांना दीड वर्षांचा अनुभव असून त्यांच्या करिअरची सुरुवात २०२१ पासून झाली. त्यावेळी त्यांनी नागपुरातील चॅनल UCN न्यूज आणि विविध यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया चॅनल्ससाठी अँकर, रिपोर्टर आणि कंटेंट क्रिएटर म्हणून हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये काम केलं आहे.

यूट्यूब चॅनलवर त्यांनी सविस्तर माहिती देणारे मोठे व्हिडिओ एक्सप्लेनर आणि शॉर्ट्स असे दोन्ही प्रकारचे काम केले आहे. राजकारण, गुन्हेगारी घटना अशा विविध विषयांवर सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ त्यांनी केले आहेत. युट्यूब चॅनलसाठी त्यांनी मुंबई येथे विधानसभा निवडणुकीच्या काळात फील्ड रिपोर्टींगसुद्धा केली आहे. निकालाच्या दिवशी अनेक विजयी उमेदवारांचे वन टू वन त्यांनी कव्हर केले आहेत.

शैक्षणिक पात्रता

त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण नागपूर येथील धनवटे नॅशनल कॉलेज येथून झाले आहे. त्यांच्याकडे बॅचलर ऑफ आर्ट्स मास कॉम्युनिकेशन ही पदवी आहे. २०२४ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी माध्यमात काम करण्यासाठी मुंबई गाठले. वाचकांना जागितिक घडामोडींविषयी जागरूक ठेवणे, अचूक आणि पारदर्शक बातम्या देणे त्यांचा हेतू आहे.

पत्रकारिता व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील कामगिरी

पत्रकारितेत काम करत असल्या तरी अभिनयाची त्यांना विशेष आवड आहे. नागपुरात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी विविध स्पर्धांमध्ये अभिनय केले. महाविद्यालयातर्फे पथनाट्य आणि नाटक स्पर्धांमध्ये भाग घेतला. तसेच ब्रॉन्झ मेडल मिळवला. नवराष्ट्रामध्ये काम करत असताना त्यांना बेस्ट फोटोग्राफी अवॉर्डही देण्यात आलेला आहे. चंद्रपूर येथे शालेय शिक्षण घेताना त्यांनी गायनाच्या तीन परीक्षा दिल्या. या तिन्ही परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. यासोबतच त्यांना हार्मोनिअम हे वाद्य देखील वाजवता येते. नृत्य कला आणि पर्यटन स्थळांवर भटकंतीची त्यांना विशेष आवड आहे.… आणखी वाचा