Mumbai MHADA Lottery : मुंबईत घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी, म्हाडाने 120 फ्लॅटसाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजना सुरू केली आहे. ज्यामध्ये 38 लाख ते 8 कोटी पर्यंतचे पर्याय आहेत.
फ्लॅटचं लोकेशन कुठेय?
म्हाडाने दिलेल्या माहितीनुसार, हे फ्लॅट कांदिवली, चारकोप, वडाला, पवई, ताडदेव, जुहू आणि अंधेरीसारख्या मुंबईतल्या बऱ्याच महत्त्वाच्या परिसरांमध्ये उपलब्ध आहेत. या फ्लॅटची काही दिवसांपूर्वीच लॉटरी निघाली होती. पण काही कारणास्तव हे फ्लॅट विकले गेले नाही. आता त्यांना ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’, या तत्त्वावर परत विक्रीस काढले आहेत.
Mumbai News : अमराठी बिल्डरची मुंबईत मराठी तरुणाला मारहाण, मनसेचा संताप; भाजपचा महापौर अजून बसला नाही, तरी…
अर्ज कसा करावा
या योजनेच्या नोंदणीसाठी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर 5 फेब्रुवारी गुरुवारी 2025 रोजी सुरू होईल. त्यानंतर अर्जदारांना त्यांच्या पसंतीचा फ्लॅट निवडता येईल आणि 12 फेब्रुवारी 2026 पासून सुरक्षा ठेव आणि अर्ज शुल्क भरता येईल. वेबसाइटवर फ्लॅट निवडल्यानंतर, तुम्हाला 48 तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम जमा करावी लागेल. हे पेमेंट मिळाल्यावर, म्हाडा तुम्हाला उर्वरित रकमेसाठी एक तात्पुरते ‘ऑफर लेटर’ देईल. तथापि, लक्षात ठेवा की जर तुम्ही ही 10% रक्कम 48 तासांच्या आत जमा केली नाही. तर तुमचा दावा रद्द केला जाईल आणि तुमची संपूर्ण सुरक्षा ठेव जप्त केली जाईल.
Parbhani Accident : लेकीच्या लग्नाच्या पत्रिका वाटप, मध्यरात्री काळाची झडप; मुलीला सासरी पाठवण्याआधी बापाचा करुण अंत
म्हाडाने नेमकं काय म्हटलंय?
म्हाडाने स्पष्ट केलं की, जर एखाद्या अर्जदाराने ‘तात्पुरते ऑफर लेटर’ मिळाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव फ्लॅट रद्द केला किंवा निर्धारित वेळेत पूर्ण किंमत जमा केली नाही. तर एकूण फ्लॅटच्या किमतीच्या 1% दंड वजा केला जाईल. उर्वरित रक्कम व्याजाशिवाय परत केली जाईल. गृहकर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीचा वापर करून त्यांच्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडून मिळालेले पूर्व-मंजुरी पत्र अपलोड करावे लागेल. त्यानंतर म्हाडा त्याच लॉगिन आयडीचा वापर करून बँकेला एनओसी देईल. फ्लॅटची संपूर्ण किंमत आणि मुद्रांक शुल्क भरल्यानंतर, म्हाडा अर्जदाराला वाटप आणि ताबा पत्र देईल.
