Nagpur Railways: केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या रेल्वे विकासासाठी २३,९२६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे रेल्वे विकासाला मोठी गती मिळणार आहे. नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकांवर मोठे पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत.
‘अजनी स्थानकाचा २८९ कोटी रुपये खर्चून मोठ्या प्रमाणावर पुनर्विकास केला जात आहे. या प्लॅटफॉर्मची संख्या तीनवरून सातपर्यंत वाढविण्यात येणार आहे. अजनी स्थानकाचे संपूर्ण पुनर्विकास काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. मात्र, आम्ही मे महिन्यापर्यंतच नवीन प्लॅटफॉर्मवरून रेल्वे वाहतूक सुरू करण्याचे नियोजन करत आहोत. यामुळे नागपूर स्थानकावरील भार कमी होण्यास मदत होईल आणि अजनी स्थानकावरूनही नवीन रेल्वेगाड्या सुरू केल्या जाऊ शकतील’, असे नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक विनायक गर्ग यांनी सांगितले.
Mumbai Local: लोकल तिकिट काढणं होणार अधिक सुलभ, रेल्वे स्थानकांवर 325 नवे ATVM बसवणार; कुठे-कसा होणार फायदा?
काय असतील सुविधा?
नागपूर आणि अजनी रेल्वेस्थानकांवर मोठे पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. नागपूर स्थानकासाठी सुमारे ४८८ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मध्यवर्ती सभागृह, तीन नवीन पादचारी पूल, २८ लिफ्ट, ३१ एस्केलेटर आणि आधुनिक प्रवासी सुविधांचा समावेश आहे. हा प्रकल्प मार्च २०२७पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. अजनी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २८९ कोटी रुपये लागतील. त्यामध्ये नवीन स्थानक इमारती, तीन पादचारी पूल, २१ लिफ्ट आणि १७ एस्केलेटरचा समावेश आहे. हे काम ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. नागपूर-इटारसी, सेवाग्राम-बल्लारशाह आणि वर्धा-बडनेरा विभागांमध्येही अतिरिक्त मार्गांची कामे या अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहेत.
Railway Budget: 48 मिनिटांत मुंबई-पुणे, लोकल-कोकण रेल्वेच्या फेऱ्या वाढणार; दोन बुलेट ट्रेन… राज्यातील रेल्वेला 23 हजार कोटींचं बूस्ट
दासनवमी उत्सव आजपासून
नागपूरच्या रामनगर येथील श्रीशक्तिपीठात आज, मंगळवारपासून दहा दिवसांचा श्री दासनवमी उत्सव सुरू होत आहे. या उत्सवात दररोज विविध कार्यक्रम होणार असून, पहिल्या दिवशी आचार्य महेश चंद्रकांत रेखे आणि वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचा सत्कार केला जाईल. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, १२ फेब्रुवारी रोजी दासबोधाच्या चक्री पारायणाने सांगता होईल. आयोजकांनी नागरिकांना या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
