Nashik News: समाधानकारक खुलासा सादर न केल्यास थेट राज्य शासनाकडे अहवाल पाठविण्याचा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महापालिका हद्दीत खड्ड्यांमुळे सहा जणांचा बळी गेल्यानंतर आणि या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतल्यानंतर महापालिका आयुक्त मनीषा खत्री ‘अॅक्शन मोड’वर आल्या आहेत. नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांना खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Nashik Crime: 45 वर्षीय महिलेला संपवून बॉडी विहिरीत; नाशिकमधील घटनेला धक्कादायक वळण, 18 वर्षीय संशयित अटकेतसिंहस्थाच्या कामांसह पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात आतापर्यंत सहा जणांचा बळी गेला आहे. खड्ड्यांवरून नाशिककर संतप्त झाल्यानंतर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक घेऊन शहरातील खड्डे बुजविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महासभेत नगरसेवकांनी जीवघेण्या खड्ड्यांचे खापर महापालिकेसह स्मार्ट सिटी आणि ‘एमएनजीएल’वर फोडण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी कठोर भूमिका घेत बांधकाम व पाणीपुरवठा विभागाची झाडाझडती सुरू केली आहे.
‘पाणीपुरवठा’वरही कारवाईचा बडगा
खड्ड्यांसोबतच शहराच्या विविध भागांत जलवाहिन्या फुटण्याचे प्रकारही घडत आहेत. खड्डे बुजवताना झालेल्या दुर्लक्षामुळे आणि जड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे जलवाहिन्या फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यानंतर दुरुस्तीचे कामही वेळेत होत नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पाणीपुरवठा विभागातील चार कार्यकारी अभियंत्यांसह १८ उपअभियंते व कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. खड्डे, जलवाहिनी दुरुस्तीतील दिरंगाईवरून या विभागावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
Hemlata Patil : चार महिन्यांपूर्वी बांधलेला रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला, NCP नगरसेविका हेमलता पाटलांचा संताप, काम बंद पाडत जाब विचारला...यांना बजावल्या नोटिसा
बांधकाम विभागातील शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, संदेश शिंदे, रवींद्र बागूल, रवींद्र पाटील, नवनीत भामरे, नरेंद्र शिंदे, संजय अडेसरा, विशाल गरुड यांच्यासह उपअभियंता नीलेश साळी, नितीन राजपूत, हेमराज नांदुर्डीकर, भरत ठाकरे, बाळा गाजूल, प्रशांत बोरसे, ज्ञानेश्वर जगताप, दत्तात्रय शिंगाडे, सुरेश पाटील, दत्तात्रय कोल्हे, हेमंत पठे आदींचा नोटिसा बजावलेल्यांत समावेश आहे.
शहरातील खड्डे दुरुस्तीबाबत महापालिकेच्या नऊ कार्यकारी अभियंत्यांसह २६ उपअभियंते आणि कनिष्ठ अभियंत्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. खुलासा सादर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.– मनीषा खत्री, आयुक्त, महापालिका
