जेजुरी
संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडोबा गडाच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. किरकोळ वादातून संतप्त भाविकांच्या टोळक्याने भंडार-खोबरे विक्री करणाऱ्या दुकानदारावर हल्ला करत दुकानाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास काही भाविक गडावर दर्शनासाठी जात असताना दुकानासमोर चप्पल ठेवण्याच्या कारणावरून दुकानदार व भाविकांमध्ये वाद झाला. हा वाद तात्पुरता शांत झाला असला तरी दर्शन करून परतल्यानंतर पुन्हा पेटला आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. संतप्त भाविकांनी हातात दांडके घेऊन दुकानाची तोडफोड केली.
त्या वेळी दुकानात काम करणारे पाच कर्मचारी घाबरून शेजारील घरात जाऊन दरवाजा बंद करून लपले. हल्लेखोरांनी दरवाजा फोडण्याचा प्रयत्न करत लाथा मारल्या तसेच लाकडी दांडक्याने प्रहार केला. मात्र दरवाजा न तुटल्याने आत लपलेल्या कामगारांचा बचाव झाला.
या घटनेनंतरही जेजुरी पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकारामुळे खंडोबा गड परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अपघातग्रस्त विमानाचे सर्व पार्ट्स आणि तुकडे मुंबईला पाठवले
गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाला होता या अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.. आणि आज याच अपघात झालेल्या ठिकाणाहून प्रशासनाच्या वतीने अपघात ग्रस्त विमानाचे सर्व पार्ट्स आणि तुकडे एका बॉक्समध्ये भरून मुंबईला घेऊन जाणार असल्याची बाब आता समोर आलीये. तर दुसरीकडे विमानाचा अर्धा तुकडा हा एका कंटेनरमध्ये भरून तो देखील मुंबईकडे घेऊन जाणार असल्याची माहिती मिळत आहे.. यामुळे या अपघातग्रस्त घटनेतून नेमकं काय समोर याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलंय.