• Sat. Sep 5th, 2026

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांकडील खाती जाहीर

ByMH LIVE NEWS

Jan 31, 2026
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच सुनेत्रा पवारांकडील खाती जाहीर

मुंबई

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडील खाती जाहीर करण्यात आली आहेत. अजित पवार यांच्याकडे असलेली खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहेत. याला केवळ अर्थ खात्याचा अपवाद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ मंत्रालयाचा प्रभार स्वत:कडे ठेवला आहे. राज्याचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर केला जाणार आहे. तोपर्यंत अर्थ खात्याची जबाबदारी फडणवीस यांच्याचकडे राहण्याची शक्यता आहे.

राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास ही खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे ३ खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. अर्थ मंत्रालय मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. महिन्याभरात अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यावर सध्या काम सुरु आहे. सुनेत्रा पवार यांना प्रशासनाचा गाडा हाकण्याचा फारसा अनुभव नाही. त्या पहिल्यांदाच सरकारमध्ये काम करणार आहेत. त्यातच अर्थसंकल्प तयार करण्यासाठी अवघ्या महिन्याभराचा कालावधी शिल्लक आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांनी काल मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. अजित पवार यांच्याकडील अर्थ आणि नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, अल्पसंख्याक विकास, क्रीडा आणि युवक कल्याण ही खाती पक्षाकडे कायम राहावीत, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी फडणवीस यांच्याकडे केली होती.

सध्याच्या घडीला अर्थ खातं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलं आहे. मार्च महिन्यात सादर होणारा अर्थसंकल्प फडणवीसच मांडतील, अशी शक्यता आहे. काल त्यांनी यावर भाष्य केलं. अजित पवारांनी अर्थ मंत्री म्हणून अर्थसंकल्पावर काम सुरु केलं होतं. त्यांनी अर्थसंकल्पासाठी बरीच तयारीदेखील केली होती. त्यात मी उद्यापासून लक्ष घालेन, असं फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे आगामी अर्थसंकल्प फडणवीसच सादर करतील, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed