महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. या दुर्घटनेमुळे राज्यात शोककळा पसरली आहे.
अजित पवार प्रवास करत असलेल्या चार्टर्ड विमानाची निर्मिती बम्बार्डियर कंपनीनं केली आहे. ही कंपनी कॅनडाची आहे. अजित पवार याच कंपनीच्या Learjet-45 या चार्टर्ड विमानातून अजित पवार प्रवास करत होते. विशेष म्हणजे कंपनीनं या विमानाची निर्मिती २०२१ मध्येच बंद केलेली आहे. पण त्याआधी तयार करण्यात आलेली विमानं आजही सेवेत नाहीत. त्यांची देखभाल कंपनीकडून केली जाते. Learjet श्रेणीतील विमानं जगप्रसिद्ध आहेत.
अजित पवार Learjet- 45 विमानातून मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. पण बारामतीत लँडिंग करताना विमानाला अपघात झाला. Learjet- 45 चा पहिला अपघात नाही. जगभरात या विमानाचे २०० हून अधिक अपघात झाले आहेत. Learjet- 45 चा सर्वाधिक वेग ताशी ८६० किलोमीटर आहे. या विमानाची रेंज १९०० ते २२०० नॉटिकल मैल म्हणजेच ३५०० ते ४००० किलोमीटर आहे. याचा अर्थ एकदा उड्डाण केल्यावर हे विमान ४ हजार किलोमीटर अंतर कापू शकतं.
जमिनीपासून उंचीवर उडण्याचा वेग थक्क करणारा आहे. हे विमान अवघ्या १८ ते २० मिनिटांत ४१ हजार फूट उंची गाठू शकतं. Learjet- 45 मॉडेलच्या चार्टर्ड विमानात ६ ते ८ जण बसू शकतात. विमानाच्या आतील भागाची उंची ६ फूट असते. विमानात वायफायसह सॅटेलाईट फोनची सुविधा आहे. मनोरंजनासाठी टीव्हीची सोय असते.
लहान आकाराच्या धावपट्टीवर लँडिंग आणि टेकऑफ करण्याची खासियत Learjet- 45 मध्ये आहे. या विमानात दोन इंजिन आहेत. इंधनावरील खर्चाचा विचार करता Learjet- 45 अतिशय किफायतशीर आहे. त्यामुळे ते जगभरात लोकप्रिय आहे.
