Republic Day 2026: महाराष्ट्रातील 75 पोलिसांचा गौरव! उत्कृष्ट कामगिरीची दखल; देशातील 874 पोलिसांना राष्ट्रपती पदके
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी देशभरातील ८७४ पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७५ पोलिसांना गौरवण्यात येणार आहे. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये मुंबई पोलिस दलातील राजीव जैन, महेश पाटील, पुरुषोत्तम कराड, महेश तावडे यांचा समावेश आहे. देशभरातील ८७४ पोलिसांना राष्ट्रपती पदके देण्यात येणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७५ पोलिसांचा समावेश आहे. त्यात ३१ पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांना शौर्य पदके, चार पोलिसांना उल्लेखनीय सेवेबद्दल, तर ४० पोलिसांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल पदके जाहीर करण्यात आली आहेत. अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, उपायुक्त बाळकृष्ण यादव, एसीपी सायरस इराणी, विठ्ठल कुबडे यांना उल्लेखनीय सेवेबद्दल गौरवण्यात येणार आहे.
