Western Railways पश्चिम रेल्वेने चर्चगेट-विरारदरम्यान नव्या 12 AC Local च्या फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवास अधिक गारेगार आणि आरामदायी होणार असला तरी सर्वसामान्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
धावत्या लोकलमधून पडून होणारे मृत्यू कमी करण्यासह प्रवास गारेगार होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एसी लोकल सुरू केली. प्रथम श्रेणीच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट-पास महाग असूनही एसी लोकलला गर्दी वाढत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांकडून अधिक एसी लोकल चालवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीचा विचार करून रेल्वे प्रशासनाने आणखी एसी लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai AC Local: मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी! एका मार्गावर एसी लोकलची एंट्री, तर दुसऱ्यावर फेऱ्या वाढणार; CSMT, पनवेल, वाशी…
कोणत्या फेऱ्या रद्द होणार?
पश्चिम रेल्वेच्या उपनगरी रेल्वेमध्ये सहा अप आणि सहा डाउन अशा एकूण १२ लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. २६ जानेवारीपासून याची अंमलबजावणी होणार आहे. नव्या एसी फेऱ्या सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येतील. त्यामुळे एसी लोकल फेऱ्यांची संख्या १०९वरून १२०वर पोहोचली आहे. एकूण लोकल फेऱ्यांच्या संख्येत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून हा आकडा एक हजार ४०६ इतका कायम असणार आहे, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
Central Railway: दादर, CSMT वरून सुटणाऱ्या रेल्वेंसाठी नवी स्थानकं, मध्य रेल्वेची मोठी घोषणा; कर्जत-कसारा लोकलचा होणार फायदा
सर्वसाधारण लोकलमध्ये गर्दी
एसी लोकल सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत शंभरहून अधिक सर्वसाधारण लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. एसी लोकलच्या पुढे-मागे धावणाऱ्या सर्वसाधारण लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. दुपारच्या वेळेत सलग एसी लोकल असल्याने सामान्य लोकलसाठी प्रवाशांना वाट पाहत बसावे लागते. विशेष म्हणजे, सर्वसाधारण लोकलफेऱ्या रद्द करून एसी लोकल चालवू नयेत, अशी स्पष्ट भूमिका रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत वारंवार प्रवासी संघटनांनी मांडली आहे. मात्र रेल्वे प्रशासन सामान्य प्रवाशांचा विचार न करता लोकल रद्द करून एसी गाड्यांना प्राधान्य देत असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
