• Sun. Sep 6th, 2026
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर

|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशभरातील अपडेट्ससह, राज्यातील सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्या, गुन्हेगारी-क्राईम बातम्या, ताज्या घडामोडी, बिझनेस, मनोरंजन, क्रिडासह सर्व चालू घडामोडींचे ताजे अपडेट जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.

मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौरपदावर कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असतानाच अखेर या संदर्भातील महत्त्वपूर्ण घोषणा सोमवारी नगरविकास विभागाने केली. या २९ महानगरपालिकांसाठी येत्या २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाणार असून, त्या संदर्भातील पत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर असल्याने महापौर आरक्षण सोडतीबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात होते. पत्रकानुसार नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौरपदाची आरक्षण सोडत निघेल. सभागृहाच्या पहिल्या बैठकीत महापौर निवड होईल.मात्र याआधी पडद्याच्या पाठीमागे मोठ्या घडामोडी होत असल्याचं दिसत आहे.

LIVE UPDATES

  • 08:25 AM, Jan 20 2026

    कॉंग्रेसचे नगरसेवक गुप्तस्थळी; वडेट्टीवार, धानोरकर गट विविध ठिकाणी रवाना, महापौरपदावर भाजपचाही दावा

  • 08:24 AM, Jan 20 2026

    काठावर बहुमत, महायुतीची कसरत; स्थायी समितीत ठाकरेंचे 8 नगरसेवक, तर शिंदेंच्या शिवसेनेच्या तिप्पट…

  • 08:24 AM, Jan 20 2026

    Chhtrapati Sambhajinagar Crime : प्रेयसीला संपवलं, नंतर शोधायचं नाटक, पोलिसांनी नांग्या ठेचल्या, कोर्टाकडून कठोर शिक्षा

  • 08:24 AM, Jan 20 2026

    मिरची तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले, 20 महिला जखमी, 7 जणींची प्रकृती गंभीर

  • 08:23 AM, Jan 20 2026

    Maharashtra Weather : वातावरणातील गारवा अचानक वाढला, पुढील 4-5 दिवसांत तापमान आणखी घसरण्याची शक्यता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed