Atal Setu Toll-Free: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू हा एक महत्त्वाचा पूल आहे. या पूलावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सर्व वाहनांवर टोलवर 50 टक्के सवलत मिळणार असून, काही वाहनांना तर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. कधी पर्यंत असेल ही सेवा?
राज्य मंत्रिमंडळाने ४ जानेवारी २०२४ रोजीच्या बैठकीत अटल सेतूच्या वापरासाठी ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाप्रमाणेच पुढे १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा पथकर दरही निश्चित करण्यात आले आहेत.
Mumbai News: मेट्रो स्थानकांपासून थेट घरापर्यंत बस, अवघ्या 9 रुपयांत होणार वातानुकूलित, आरामदायी प्रवास; कधी-कुठे?
एकेरी प्रवासावर आकारला जाणारा टोल
मोटर, जीप, व्हॅन, हलके मोटार वाहन – २५० रु., २०० रु. आणि ५० रु.
हलके व्यावसायिक वाहन, हलके मालवाहू वाहन, मिनी बस- ४०० रु.,३२० रु., ८० रु.
ट्रक अथवा बस ( दोन आसांचे) – ८३० रु., ६५५ रु., १७० रु.
तीन आसांचे व्यावसायिक वाहन- ९०५ रु. ७१५ रु. १८५ रु.
अवजड बांधकाम यंत्रसामग्री, जमीन खोदाई यंत्रसामग्री, अधिक आसांचे वाहन – १३०० रु., १०३० रु., २७० रु.
अति अवजड वाहन, सात अथवा त्यापेक्षा अधिक आसांचे वाहन- १५०० रु.१२५५रु.आणि ३२५ रु.
Mumbai Roads Closed: कोस्टल रोड, सी लिंक, CSMTसह अनेक मार्गांवर ‘नो एन्ट्री’, रविवारी मुंबईकरांचा मोठा खोळंबा, पर्यायी मार्ग पाहा
दुचाकीस्वाराचा मृत्यू
खारघरमधील उत्सव सर्कलजवळ भरधाव सिमेंट काँक्रीट बल्करने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. खारघर पोलिसांनी सिमेंट बल्कर चलकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
Sharmila Thackeray : आमचे नगरसेवक चोरले, पैसे ओतले; शर्मिला ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
या अशोक मादापाटील (६६) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते खारघर सेक्टर-१२मधील सनसफल सोसायटीत कुटुंबासह राहत होते. दुपारी २च्या सुमारास ते कामानिमित्त खारघर हायवेकडे जात हा अपघात झाला. या अपघातात अशोक मादापाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा काही वेळातच मृत्यू झाला.
