मुंबईत एका रुग्णालयात महिला पत्रकाराच्या वडिलांचं निधन झालं. पण मृत्यूनंतर यातना देणं काय म्हणतात, ते महिला पत्रकाराच्या कुटुंबाने अनुभवल्याचा दावा केला जात आहे. वडिलांच्या निधननंतर तब्बल 8 तासांनी त्यांचा मृतदेह महिला पत्रकाराच्या कुटुंबियांना देण्यात आला. या घटनेप्रकरणी महिला पत्रकाराने गंभीर आरोप केले आहेत.
मुंबईतील एका ख्यातनाम वृत्तवाहिनीत काम करत असणाऱ्या एका महिला पत्रकाराचे वडील महेश भालेराव यांना 8 जानेवारीला मसिना हॉस्पिटल ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान महेश भालेराव यांचे 10 जानेवारीला पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास निधन झालं. या घटनेमुळे भालेराव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला होता. पण या दु:खद काळातही रुग्णालयाकडून अपेक्षित अशी माणुसकी दाखवण्यात आली नाही, असा आरोप भालेराव कुटुंबियांचा आहे.
BMC All Candidate List : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तुमच्या प्रभागात कोणाकोणात लढत? वाचा A टू Z यादी
एकीकडे वडिलांचं निधन झालं आहे. घरातील कुटुंबियांना या कठीण काळात सावरण्याची जबाबदारी, मनोधैर्य गळून पडावं अशा या संकट काळात रुग्णालय प्रशासनाने महिला पत्रकाराशी माणुसकीने वागणं अपेक्षित होतं. पण याउलट रुग्णालय प्रशासनाकडून पैसे, डॉक्युमेंट प्रोसेसच्या नावाखाली महेश भालेराव यांचा मृतदेह कुटुंबियांना देण्यास तब्बल 8 तास टाळाटाळ करण्यात आला. विशेष म्हणजे महिला पत्रकाराने आणि तिच्या नातेवाईकांनी सातत्याने रुग्णालय प्रशासनाला कळकळीची विनंती केली. पण निगरगट्ट रुग्णालय प्रशासनाकडून त्याकडे काळाडोळा करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या सगळ्या काळात महिला पत्रकाराने रुग्णालयाच्या ट्रस्टी कविता पै. यांना भेटण्याची विनंती केली. पण त्यांची भेट मिळाली नाही. याउलट महिला पत्रकाराला वडिलांचा मृतदेह ताब्यात मिळावा यासाठी इकडून तिकडे फेऱ्या माराव्या लागल्या.
Thane Municipal Election Candidate List : ठाणेकरांनो तुमच्या कामाची बातमी! महापालिका निवडणुकीतील A टू Z उमेदवारांची यादी इथे वाचा
या प्रकरणी महिला पत्रकाराने मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबईच्या चॅरिटी किमिश्नर यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. या घटनेची राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीदखील दखल घेतली आहे. त्यांनी या प्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता संबंधित रुग्णालय प्रशासनाची चौकशी होऊन कारवाई होते का? या प्रकरणात काय निष्पन्न होतं? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
