गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या कामामुळे नागरिकांना समस्या
मुलुंडमध्ये सतत काही ना काही पुलांचं, रस्त्यांचं अशी खोदकामं सुरू आहे. मेट्रो आणि आता Goregaon-Mulund Link Road प्रकल्पामुळे रहिवाशांना अधिकच त्रास होत आहे. खाजगी कंपन्यांनी या भागात केबल टाकल्या आहेत. इथे सतत वीज जात असल्याने नागरिकांना त्रास होतो. सतत वीज खंडित होत असल्याने या कामामुळे मुलुंडकरांच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत. याच मुलुंड कॉलनीतील रहिवाशांना लिफ्टशिवाय खाली उतरावं लागतं. या भागात पार्किंगचीही मोठी गैरसोय होत आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचं काम सुरू असलेल्या मुलुंड कॉलनीमध्ये भागात पादचारी आणि वाहनांसाठी अतिशय अरुंद जागा आहे. ही जागा पादचाऱ्यांना चालण्यासाठी आणि वाहनांच्या ये-जासाठी आहे. पण या अरुंद जागेचा वापर अनेकदा पार्किंगसाठी केला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
वीज अनेकदा खंडित, धुळीचं साम्राज्य
दुसरी मोठी समस्या म्हणजे गोरेगाव-मुलुंड लिंकचं काम सुरू असल्याने इथे मोठ्या प्रमाणात परिसरात हवा प्रदूषण आणि धुळीचं साम्राज्य पसरलं आहे. अनेकांना श्वसनासंबंधी आजारांचा त्रास होत आहे.
नागरिकांच्या या समस्येवर मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने बोलताना सांगितलं, की या भागातील नागरिकांनी सतत वीज जाण्याबाबत कोणतीही तक्रार केलेली नाही. तसंच ग्राहक कोडसह नागरिकांनी तक्रार नोंदवली असल्यास समस्येच्या मुळाशी जाता येईल. तसंच याबाबत महानगर गॅस लिमिटेडनेही सांगितलं, की सुरक्षिततेच्या दृष्टीने विशिष्ट भागातील पीएनजी गॅस पुरवठा तात्पुरता थांबवला जातो. तसंच गॅस बंद होणार असल्याची माहिती आधीच नागरिकांना सांगितली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.
कधी पूर्ण होणार पुलाचं काम?
नागरिकांनी केलेल्या तक्रारीवर बीएमसीनेही उत्तर दिलं आहे. बीएमसीने प्रदूषण तसंच कामाबाबत सांगतिलं, की प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी, अँटी-स्मॉग गन वापरल्या जात आहेत. हिरव्या कापडाचाही पुलाच्या कामावेळी वापर केला जात आहे. तसंच रस्त्यांवर पाणी शिंपडलं जात आह. सोनकर जंक्शन या भागात एक केबल-स्टेड ब्रिज उभारला जाणार आहे. या ब्रिजचं काम डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. जी.जी. सिंग रोड जवळील सिसटी ओएसिस बिल्डिंगपासून सोनपूर जंक्शनपर्यंतचा एक उड्डाणपुलाचा दोन लेनचा भाग जूनपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. तसंच मुलुंडजवळील संपूर्ण उड्डाणपुलाचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
