Nanded Father Commits Suicide with Son : नांदेड जिल्ह्यातील किनवटमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्या चिमुकल्यासोबत विहिरीत उडी घेत आयुष्य संपवलं.
पोटच्या लेकरासह विहिरीत उडी…
विक्रम मारशेटवार हे आपल्या कुटुंबासोबत दहेली येथे राहत होते. काही महिन्यांपासून त्याची पत्नी दोन वर्षाच्या मुलाला सोडून एकटी माहेरी राहत होती. परत येण्यासाठी विक्रम याने अनेकवेळा तिला सांगितलं, परंतु ती काही नांदायला आलीच नाही. त्यामुळे पत्नीच्या विरहात विक्रमने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला घेऊन सोमवारी दि. 5 डिसेंबर रोजी सायंकाळी गावातील राजेश संटी दिसलवार यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन स्वत:सह चिमुकल्याचं जीवन संपविले. काल मंगळवारी सकाळी बाप-लेकाचा मृतदेह पाण्यात तरंगताना गावातील काही लोकांना निदर्शनास आले.
Pune Crime : नाईट शिफ्टला असताना वॉशरुमला गेला, राऊंड मारताना सिक्युरिटी गार्ड आतलं दृश्य पाहून हादरला; पुण्यात IT इंजिनिअरने…
पत्नीच्या विरहात पतीचं टोकाचं पाऊल
सकाळी घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिंदखेड पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृतांचे शवविच्छेदन दहेली तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काल मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता करण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मृत विक्रम मारशेटवार यांच्या पश्चात आई व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ठाणेदार रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार संतोष कोंडापेल्लीवार तपास करीत आहेत. पत्नीच्या विरहात पतीने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे.
