Pune Election News : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १२८ जागांसाठी ६९२ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी मुख्य लढत होणार आहे. भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध निवडले गेले असून, चिन्ह वाटपानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
उमेदवारी अर्ज माघारीनंतर शनिवारी (तीन जानेवारी) दुपारपर्यंत उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. त्यामध्ये पक्षाचे एबी फॉर्म न असलेल्यांना पक्षाचे चिन्ह मिळाले न आहे. उर्वरित २०८ उमेदवारांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह मिळाले आहे. त्यासाठीचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले होते.
Ravindra Chavan: महायुतीत वादाची ठिणगी; अजित पवारांबाबत मुख्यमंत्र्यांना सल्ला दिल्याचा रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
भारतीय जनता पक्षाची रिपब्लिकन पक्ष वगळता अन्य कोणत्याही पक्षाशी युती झालेली नाही. रिपब्लिकनच्या उमेदवारांनीही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप विरोधात राष्ट्रवादी आणि अन्य विरोधक अशी लढत पहावयास मिळणार आहे. विरोधकांमध्येही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे दिसून आले आहे.
Ajit Pawar : गुन्हेगाराच्या पत्नीला उमेदवारी का दिली? अखेर अजित पवार यांनी मौन सोडलं, म्हणाले…
या चिन्हांचे वाटप
बंडखोरी केलेल्या व अपक्ष उमेदवारांना सर्वाधिक कपबशी, त्याखालोखाल नारळ, ऑटो रिक्षा, पुस्तक, कपाट, शिटी, बॅट, एअर कंडिशनर सफरचंद, कोट, शिवणयंत्र, नगारा, हिरा, मेणबत्ती, ट्यूबलाइट, सीसीटीव्ही कॅमेरा, टीव्ही, चष्मा, रोड रोलर, पेनाची नीब, बुद्धिवळ, बस, किटली, मण्याचा हार, पोळपाट लाटणे, हेडफोन, टोपली, फुटबॉल, सूर्यफूल, स्टम्प, फलंदाज, पांगुळगाडा, फुगा, हेलिकॉप्टर, टॉर्च, नारळाची बाग या चिन्हांचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढती पहावयास मिळणार आहेत.
