तुम्ही तुमच्या वाहनाची HSRP नोंद केली आहे का? कारण HSRP नोंद करण्यासाठीची मुदत आता संपली आहे. तसं असलं तरी अजूनही तुम्ही शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावून करु शकता. कारण तसं न केल्यास आता आरटीओ कारवाईच्या भूमिकेत राहणार असल्याची माहिती आहे.
मात्र अद्यापही नागपूर जिल्ह्यात १३ लाखांपेक्षा अधिक वाहनांनी नवीन नंबरप्लेटसाठी नोंदणीच केली नाही, त्यामुळे या वाहनांवर आता परिवहन आयुक्तांच्या सूचनांनंतर कारवाईची मोहीम हाती घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी (ग्रामीण) विजय चव्हाण यांनी सांगितले. एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनांवर भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल. मात्र ३१ डिसेंबरपर्यंत ज्यांनी नोंदणी करून वेळ निश्चित केली, त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
एचआरपीएस न बसविणाऱ्या वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण, कर्जबोजा उतरविणे आदी कामे थांबविण्यात येईल. वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनात बदल करणे, परवाना नूतणीकरण ही कामेही होणार नाही, असे परिवहन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. वाहनांची संख्या अधिक असल्याने पुन्हा मुदत वाढविण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
Eknath Shinde यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, ‘फडणवीसांनी ठाकरेंना 50 फोन केले, मी साक्षीदार’
कारवाईपासून वाचण्यासाठी काय करावं?
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंद झालेल्या वाहनांसाठी राज्य सरकारने एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी सरकारने दिलेली मुदत आता संपली आहे. सरकार आता थेट नियमांचं पालन न करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्याच्या भूमिकेत आहे. एखाद्या वाहनाला एचएसआरपी नंबरप्लेट नसेल तर त्या वाहनधारकाला दंड भरावा लागेल. सुरुवातीला पहिल्यांदा आढळला म्हणून 1 हजार रुपये इतकं असू शकतं. पण त्यानंतर परत सापडल्यास 5 ते 10 हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
Municipal Election : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांना धडकी भरवणारी बातमी, मनसेचा मोठा निर्णय
या कारवाईपासून वाचण्यासाठी वाहनचालकांनी राज्य परिवहन विभागाच्या transport.maharashtra.gov.in या अधिकृत वेबपोर्टलवर जावून नोंद करुन घ्यावं. तिथे योग्य ते पेमेंट करावं. त्याची पावती वाहतूक पोलिसांना दाखवल्यास त्या वाहनधारकांवर कोणतीही कारवाई होणार नाही.
