Pandharpur Vitthal Mandir News : पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात नववर्षाच्या सुरुवातीला महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिर समितीने मूर्तींबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
जतन आणि संवर्धन कामाची पाहणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर पुरातत्व विभागाचे अधिकारी आणि संबंधित आर्किटेक्चर यांनी केल्यानंतर भंग पावलेल्या मुर्तीचं वास्तव काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं.
Jyotirlinga Darshan : ज्योतिर्लिंग दर्शनाला जाताय? 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवलिंगाचं गाभाऱ्यातील दर्शन बंद, प्रशासनाचा निर्णय
हिंदू धर्मशास्त्रानुसार कोणत्याही मंदिरात भग्न मूर्ती पूजेसाठी ठेवली जात नसल्याने आता भग्न पावलेल्या या शेकडो वर्षांपूर्वीच्या मूर्ती बदलाव्या लागणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे. ज्या वेळेला या पुरातन मूर्तींवरील लेप काढण्यात आला त्यावेळी या मूर्ती भंग पावल्याचं समोर आल्याचं अवसेकर यांनी सांगितलं. याबाबत मूर्ती बनवायचं काम पूर्ण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
Ratnagiri News : इटलीतून हाकललेल्या कंपनीला कोकणात पायघड्या, घातक विषारी रासायनिक बनवणारा प्रकल्प रत्नागिरीत; कोकणवासींमध्ये संताप
या नवीन मूर्ती बसवल्यानंतर पूर्वीच्या शेकडो वर्षापूर्वीच्या पुरातन भग्न मूर्ती मंदिरातच म्युझियमच्या स्वरूपात संरक्षित केल्या जाणार असल्याचंही गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं.
सरत्या वर्षातील संकटं ओढवलेली नव्हती तर जाणीवपूर्वक आलेली; धनंजय मुंडेंनी मनातलं सांगितलं
मंदिराचं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असताना मंदिरात असणाऱ्या 24 परिवार देवता आणि बाहेर असणाऱ्या 28 परिवार देवता मंदिरातील मूर्तींचं परीक्षण पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आलं होतं. यानंतर पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार ज्या मूर्ती भग्न पावलेल्या आहेत अशा मूर्तींच्या जागी नवीन मुर्ती तयार करून घेण्यात आल्याचं कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं. ज्या ठिकाणी परिवार देवतांच्या मंदिराची कामं पूर्ण झाली आहेत, त्या ठिकाणी येत्या आठ दिवसात धार्मिक पद्धतीने उपचार करून या नवीन मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याचंही कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितलं आहे.
