Beed Crime News : बीडमधून एक धक्कादायक समोर आली आहे. एका पोलिसाने आपल्या वरती चुकीच्या पद्धतीने वापर करत पतीपासून विभक्त असलेल्या महिलेची फसवणूक केली. नेमक प्रकरण काय जाणून घ्या.
लॉजवर केला अत्याचार
या प्रकरणातील सर्वात भयावह वळण आले. आरोपीने महिलेला माजलगाव येथील एका लॉजवर नेले. तिथे लग्नाचा शब्द देऊन त्याने पीडितेवर अत्याचार केला. पीडितेने असाही आरोप केला आहे की, आरोपीने त्यावेळी उत्तेजक गोळ्यांचे सेवन केले होते, ज्यामुळे तिला गंभीर शारीरिक इजा झाली. या जखमांमुळे पीडितेला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिला तीन टाके पडले. विशेष म्हणजे, या उपचाराचा खर्च आरोपीने ऑनलाइन पद्धतीने भरला होता, जो आता या गुन्ह्यात महत्त्वाचा तांत्रिक पुरावा मानला जात आहे.
Beed News : अरे चल, बँक बंद होणार! निवडणुकीच्या तोंडावर उडाली अफवा,रात्रीत लोकांनी… बीडमध्ये नेमकं काय घडलं?
जातीवाचक शिवीगाळ
जेव्हा पीडितेने या सर्व प्रकारानंतर लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपीने तिला धमकावण्यास सुरुवात केली. मी पोलीस आहे, वरिष्ठ अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत, तू माझे काहीही करू शकत नाहीस, असे म्हणत त्याने तिला तुच्छ वागणूक दिली. तसेच, पीडितेचे खाजगी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यासोबतच तिला जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित करण्यात आले.
Beed News : खोलीचा दरवाजा आतून बंद, शाळकरी मुलगी बराच वेळ बाहेर येईना; कुटुंबीयांनी शोध घेतला आणि…; समोरील दृष्याने सगळेच हैराण
पीडितेची न्यायासाठी धाव
पोलीस कर्मचाऱ्याकडूनच होणाऱ्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने कायदेशीर लढा देण्याचे ठरवले आहे. तिने याप्रकरणी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणे.गंभीर शारीरिक इजा पोहोचवणे. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
