पुण्यासह राज्यात डिसेंबर महिन्यात थंडीची लाट आलेली बघायला मिळाली. पुण्यातही तापमानाचा पारा चागलाच घसरलेला बघायला मिळाला. पण आगामी काळात तापमानात वाढ होणार असल्याची माहिती आहे.
ऑक्टोबर हिटमुळे वातावरणात तापायला लागण्यापूर्वीच थंडीने बस्तान बसवले, नोव्हेंबरमध्ये थंडीची लाट आल्याने महिनाभर पुणेकरांनी गुलाबी थंडी अनुभवली. डिसेंबरमध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिले होते, त्यानुसार यंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा घसरला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अनुकूल वातावरण मिळाल्याने पुण्यात महिनाभर किमान तापमान दहा अंशाच्या खालीचे रेंगाळले. हंगामातील नीचांकी ७.९ अंश सेल्सिअस तापमान ११ डिसेंबरला नोंदविण्यात आले.
Pune News : उमेदवारीचा वाद विकोपाला! पुण्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याने चक्क ‘एबी फॉर्म’च खाल्ला
गेल्या वर्षी प्रतिकूल वातावरणामुळे हवेत अपेक्षित गारवाच नव्हता. त्यामुळे पुणेकरांना डिसेंबर महिन्यात स्वेटर घालण्याचीही संधी मिळाली नव्हती. या वर्षी मात्र, संध्याकाळनंतर वाढत जाणारा गारठा आणि मध्यरात्रीनंतर वाढत जाणाऱ्या कडाक्याच्या थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरली. वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर, शाल, जॅकेट, मफलर, कानटोप्या मिरविण्याची हौशी नागरिकांना संधी मिळाली. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाही आनंदोत्सवासाठी बाहेर पडलेले उत्साही पुणेकर थंडीपासून बचाव करण्यासाठी जय्यत तयारीनिशी फिरताना दिसले.
Municipal Election : मतदानाच्या आधीच गुलाल उधळला, भाजपची विजयी घोडदौड, राज्यभरात 6 नगरसेवकांची बिनविरोध निवड
काही दिवस कमाल तापमानही २७ अंशापर्यंत खाली घसरले होते. त्यामुळे गारठ्यापासून वाचण्यासाठी दिवसाही ऊबदार कपडे घालून फिरावे लागले. वेगवेगळ्या कट्ट्यांवर नागरिकांच्या गप्पांमध्ये यंदा कडाक्याच्या थंडीची चर्चा रंगल्या. उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यात अडथळे नसल्याने मध्य महाराष्ट्रातही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक गारठा होता. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मात्र पुण्यासह मध्यमहाराष्ट्रात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.
डिसेंबर महिन्यात या पूर्वी नोंदविलेले तापमान
सरासरी किमान आणि कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
- २०२० – १३.८ – २९.७
- २०२१ – १४.४ – २८.२
- २०२२- १४.४- ३१.३
- २०२३- १४.३ – ३०
- २०२४ – १४.९ – ३०.४
- २०२५ – १०.०५ – २८.७
