• Tue. Sep 22nd, 2026
Maharashtra Live News 31st December 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Mumbai Metro : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज, आज रात्री 12 नंतरही सुरू राहणार मेट्रो

घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो-१ वर्षअखेरीच्या निमित्ताने आज, बुधवारी मध्यरात्रीनंतरही सुरू राहणार आहे. नियमित सेवा संपल्यानंतर, बुधवारी रात्री ११.२६ ते गुरुवारी पहाटे २.४० या दरम्यान या मार्गावर २८ अतिरिक्त फेऱ्या चालविल्या जाणार आहेत. नववर्ष सुरू होताना, भुयारी मेट्रो-३ प्रशासनाने बुधवार-गुरुवार या दरम्यानच्या रात्रभर सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मेट्रो-१ प्रशासनानेही मध्यरात्रीनंतर सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *