BMC Election MT Online YouTube Poll : युतीची घोषणा, मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? असा प्रश्न महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन यूट्यूब पोलमध्ये विचारण्यात आला होता
मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी कधीही पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक नव्हती, मात्र इतर कुठल्याही भाषकांपेक्षा ती कायम अधिक राहिलेली आहे. राजकीयदृष्ट्या मुंबई शहरातील लोकसंख्येचा पट पाहिला तर सहा लोकसभा मतदारसंघांत मराठी माणसांची संख्या चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याने मराठी मतदारांची एकी होणार का, भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांना फटका बसणार का, की दोघा भावांची युती ही महायुतीपुढे निष्प्रभ ठरणार, हे १६ जानेवारीला स्पष्ट होईल.
Prakash Mahajan : ठाकरे बंधूंच्या एकीसाठी झटले, आता त्यांच्याच विरोधात शड्डू; मनसे सोडलेले प्रकाश महाजन शिवसेनेच्या वाटेवर
मटा ऑनलाईन पोलमध्ये प्रश्न काय?
युतीची घोषणा, मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार? असा प्रश्न मटाच्या ऑनलाईन पोलमध्ये विचारण्यात आला होता. ठाकरे बंधू अर्थात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती, शिंदे-फडणवीस अर्थात शिवसेना आणि भाजप यांची युती की इतर असे तीन पर्याय देण्यात आले होते. २४ तासांच्या कालावधीत जवळपास सव्वादोन लाख युजर्सनी मतदान केले, तर ४५० हून अधिक जणांनी कमेंट्समधून आपले मत व्यक्त केले आहे.
Meenakshi Shinde : दोन दिवसांपूर्वीचा वाद टोकाला? शिंदेसेनेच्या मीनाक्षी शिंदेंचा तडकाफडकी राजीनामा, धक्कादायक कारण समोर
ऑनलाईन पोलचे निकाल काय?
ठाकरे बंधू यांच्या युतीला ८२ टक्के युजर्सनी मतदान केले आहे. म्हणजेच जवळपास १ लाख ८४ हजार नेटिझन्सनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या युतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर १६ टक्के युजर्स म्हणतात की शिंदे-फडणवीस यांच्या युतीला बीएमसी निवडणुकीत यश मिळेल. म्हणजेच जवळपास ३५ हजार युजर्सनी शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने कौल दिला आहे.
Maharashtra Politics : भाजपची जबरा खेळी, जिथे ‘कमळ’ फुलण्याची खात्री नाही, तिथे उमेदवारांना राष्ट्रवादीत पाठवलं, आता फटका…
या ऑनलाईन पोलमधून केवळ नेटिझन्सच्या मताचा अंदाज महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने घेतला आहे. या पोलमध्ये मतदान करणारे युजर्स हे मुंबई महापालिकेचे मतदार असतीलच असे नाही. किंबहुना मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशाबाहेरील युजर्सनेही मतदान केले आहे. त्यामुळे हे निकाल प्रत्यक्ष मुंबई महापालिका निवडणुकांच्या निकालाचे प्रतिबिंब मानता येणार नाही. केवळ ऑनलाईन जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. प्रत्यक्ष निकाल आणि ऑनलाईन पोल यांच्यात तफावत आढळू शकते.
Raj – Uddhav Alliance: मुंबईचा महापौर मराठीच असेल, आमचाच असेल, ठाकरे बंधू काय म्हणाले
