Washim Accident : वाशिममध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अपघात कसा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार शिर्डीवरून नागपूरकडे जात असलेल्या आयशर ट्रक क्रमांक एमएच 04 जेके 9416च्या वाहन चालकाने ट्रकच्या टायरमधील हवा चेक करण्यासाठी ट्रक उभा केला होता. मागील टायरमधील हवा चेक करत असताना मागून येणाऱ्या आयशर ट्रक क्रमांक एमएच 14 एचयू 7395च्या चालकाला झोपेची डुलकी लागल्यानं उभे वाहन दिसले नसल्यानं जोरदार धडक बसली. या झालेल्या भीषण अपघात उभ्या असलेल्या वाहन चालकाचा जागीच मृत्यू झाला. सुभाष पाटील वाघ (वय 25, रा. सावली ता. जि. बुलढाणा) असं मृत्यू झालेल्या वाहन चालकाचं नाव असून मागून येणाऱ्या आयशरमधील वाहनचालक अनिकेत सिंग व त्याचा सहकारी संतोष सिंग हे गंभीर जखमी झाले आहेत.
Washim News : पत्नीचा नगराध्यक्षपदी पराभव, पतीची भावनिक फेसबुक पोस्ट, दुसऱ्या दिवशी मृत्यू, डोळे पाणावणारी घटना
अपघाताची माहिती मिळताच पोलीस केंद्र अमानी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन दांदडे, पोलीस हवालदार विनोद कदम, पोलीस अंमलदार गणेश गावंडे हे घटनास्थळी पोहोचले. अपघातात आयशरमध्ये फसलेल्या चालक व त्याच्या सहकाऱ्याला इतरांच्या मदतीने बाहेर काढून तिन्ही अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. डॉक्टरांनी सुभाष पाटील वाघ याला व दुसऱ्या वाहनातील एकाला मृत घोषित केलं. तर एका जखमीवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारार्थ हलविण्यात आलं आहे.
Nanded Crime : एकीकडे आई-वडील घरी मृतावस्थेत, दुसरीकडे पोटच्या लेकरांनी रेल्वेखाली जीव दिला, चौकोनी कुटुंबाचा क्षणात अंत; महाराष्ट्र हादरला
वाहनं क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढले
श्री. गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख घटनास्थळी जात असताना त्यांनी लोकेशन शेलुबाजार 108 समृद्धी महामार्ग कारंजा येथील चालक आतीश चव्हाण आणि डॉक्टर गणेश यांना अपघाताची माहिती दिली. सर्वजण रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी पोहोचून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने महामार्गाच्या बाजूला लावण्यात आले असून पुढील तपास कारंजा पोलीस करत आहेत.
