Beed Crime News : लग्नासाठी मुली मिळत नसल्याने अनेक तरूणांसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे एखादं स्थळ आल्यावर लवकर बोलणी करून उरकायचं ठरवतात, पण हे गुडघ्याला बाशिंग घालणं घातक ठरतं, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.
पाचव्या दिवशी नवरी पसार
पंढरपूर येथे नोटरी पद्धतीने आणि त्यानंतर गावी धार्मिक विधी करून संजय यांचा विवाह रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव, वैजापूर) हिच्याशी पार पडला. लग्नानंतर पाच दिवस रुपाली सासरी व्यवस्थित राहिली. मात्र, १५ डिसेंबरच्या रात्री घरातील सर्वांची नजर चुकून ती ४ लाखांची रोकड आणि २ लाखांचे दागिने घेऊन पसार झाली.
Beed Crime : बीडमध्ये आता गाडी माफिया प्रकरण समोर, हैदराबाद कनेक्शन उघड, नवनीत काँवत यांची धडाकेबाज कामगिरी
उलट चोरावर मोर: धमकीचा प्रकार
नवरी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच संजय यांनी मध्यस्थांशी संपर्क साधला. मात्र, मध्यस्थांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. कहर म्हणजे, मुलीची मावशी जयश्री शिंदे आणि एजंट महिलेने संजय यांनाच धमकावले. “मुलगी आता परत येणार नाही, पुन्हा फोन केला तर तुझ्यावर आणि तुझ्या मित्रांवर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करू,” अशी धमकी त्यांनी दिली. या धमकीनंतर आपली संघटित टोळीकडून फसवणूक झाल्याची खात्री संजय यांना पटली.
Beed Crime : तमाशा सुरु असताना राडा, एकाला सहा जणांनी घेरलं, स्टेजवरच बेदम मारहाण; बीडमध्ये खळबळ; VIDEO
गुन्हा दाखल, आरोपींची नावे समोर
संजय पवार यांच्या तक्रारीवरून अंमळनेर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला यामध्ये दत्ता पंढरीनाथ पवार (रा. सुपा, पाटोदा) – पठाण (रा. चोभा निमगाव, आष्टी) – रुपाली बाळू दिशागंज (रा. लाडगाव) – नवरी जयश्री रवी शिंदे (रा. पंढरपूर) – कथित मावशी आणि अनोळखी महिला एजंट या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ करत आहेत. लग्नाळू तरुणांनी अशा मध्यस्थांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
