Hawaman Andaj Weather Alert Today : पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. पुढील दोन दिवस हवामान असंच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.
पुणेकरांना कडाक्याच्या थंडीमुळे हुडहुडी
पुण्यात गेल्या वर्षी मोजक्या काही दिवसांचा अपवाद वगळता हिवाळ्यात अपेक्षित थंडी जाणवली नाही, या वर्षी तरी स्वेटर घालून फिरण्याची संधी आम्हाला मिळणार का, अशी चर्चा पुणेकरांमध्ये गेल्या महिन्यापर्यंत होती; पण नोव्हेंबर पाठोपाठ डिसेंबरमध्येही कडाक्याच्या थंडीमुळे पुणेकरांना हुडहुडी भरली आहे. त्यामुळे आता चांगली थंडी पडल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यभरातील अनेक शहरांमध्ये थंडीची लाट ओसरली असली, तरी गारठा मात्र कायम आहे.
Pune Metro : पुणेकरांचा प्रवास अधिक सुखकर, हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच सुरू; कसा असेल 23 किमीचा मार्ग?
मध्य महाराष्ट्रात गारठा, थंडीची लाट ओसरणार होती, पण पुन्हा तापमानाचा पारा घसरला
उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यात अडथळे नसल्याने यंदा मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पुण्यातही मध्यवर्ती शहरासह उपनगरांमध्ये वारंवार तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात येते आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात थंडीची लाट होती. शुक्रवारपासून लाटेचा प्रभाव ओसरणार असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले होते. मात्र, शनिवारपासून पुन्हा पारा आठ अंशांपर्यंत खाली घसरला. सलग चार दिवस तापमान 9 अंशापेक्षा खालीच रेंगाळले आहे. 9 ते 16 डिसेंबर दरम्यानही हिच परिस्थिती होती.
ना चप्पल, ना शाळेची फी, कांद्यासोबत चिमुकलीचे स्वप्नही गेले; अवकाळीमुळे बीडमध्ये नुकसान
पुढील दोन दिवस असंच वातावरण राहणार
संध्याकाळनंतर वाढत जाणाऱ्या हवेतील आल्दाददायक गारव्यामुळे सध्या पुणेकर आकर्षक प्रकारातील रंगीबेरंगी स्वेटर, कानटोप्या, मफलर घालून फिरायला बाहेर पडत आहे. दोन दिवसांपासून दुपारीही गार वारे वाहत असल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळते आहे. पुढील दोन दिवस असेच वातावरण कायम राहणार असून, गुरुवारनंतर तापमान वाढणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने व्यक्त केला आहे.
