Latur Burning Car Incident : लातूरमध्ये विम्याच्या पैशांपायी एका निष्पाप व्यक्तीची नशेमध्ये असताना कारमध्ये बसवून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
24 तासांत आरोपीला अटक
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपीच्या डोक्यावर 57 लाखांच्या फ्लॅटच्या हप्त्यातून कर्ज झालं होतं. त्यामुळे त्याने एक कोटीच्या विम्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. या कथित कार अपघातात लिफ्ट मागणाऱ्यास आपणच जाळून मारल्याची कबुलीही त्याने पोलिसांना चौकशीवेळी दिली. गणेश चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत कोकणातील विजयदुर्ग (जि. सिंधुदुर्ग) येथून त्याला अटक केली आहे.
Jalgaon News : शाळेची संरक्षण भिंत कोसळलेली, तिथेच लघुशंकेला गेले, पाय घसरल्यानं चिमुकल्यांचा नाल्यात करुण अंत; मिटलेले डोळे बघून आई-बापाचा आक्रोश
हातातील कडं आणि…
पोलिसांनी सांगितलं की, वानवडा पाटी ते वानवडा येथे एका कारला शनिवारी पहाटे आग लागली असल्याचा फोन आला. रात्री गस्तीवरील औसा ठाण्याचे अधिकारी, अंमलदारांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आलं. त्यांनी आग आटोक्यात आणली. कारमध्ये एक मानवी हाडाचा सांगाडा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळला. यावरून पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. जळालेल्या मृतदेहाचे जागेवर शवविच्छेदन केले. जळालेल्या कारमधून प्राप्त झालेल्या हातातील कडं आणि कारचा क्रमांक यावरून हा सांगाडा गणेश चव्हाण याचाच असल्याचा नातेवाइकांनी दावा केला. पोलिसांनी मृतदेह दफन करण्याच्या अटीवर नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
Latur Crime : चार दिवसांपूर्वी महिला बेपत्ता असल्याची तक्रार, काल तलावात पुरुषासह महिलेचा मृतदेह तरंगताना आढळला; लातूरमध्ये नक्की काय घडलं?
मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडला
घटनास्थळावर जळालेल्या कारचा क्रमांक MH 43 AB 4200 असून, पोलिसांनी कारच्या मालकाचा शोध घेतला. ही कार बळीराम गंगाधर राठोड (रा. औसा तांडा) यांची असल्याचं चौकशीमध्ये समोर आलं. हे वाहन त्यांचा मेहुणा म्हणजे आरोपी गणेश गोपीनाथ चव्हाण (रा. विठ्ठल नगर, औसा) वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गणेश चव्हाणचा शोध घेतला असता, तो 13 डिसेंबर रोजी रात्री म्हणजे शनिवारी 10 वाजता मित्राला लॅपटॉप देण्यासाठी बाहेर पडला. तो घरी परतला नसल्याची माहिती पत्नीने दिली. घटनास्थळावरील पुरावे, मोबाइल चॅटिंग आधारे आरोपीचा शोध घेतला. एक सुगावा पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर बनावट मृत्यूचा आणि गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
