Beed Tinterwani Lake Unidentified Person Body Found : बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कासारमधील तिंतरवणीमधील तलावात एका अनोळखी व्यक्तीचा मृतेदह तरंगताना आढळून आला आहे.
चकलांबा पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन, चकलांबा पोलिसांनी कोणतीही वेळ न दवडता तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने तिंतरवणी गाठलं. पोलिसांच्या उपस्थितीत सदर मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट असल्यामुळे तो नेमका किती दिवसांपासून पाण्यात असावा, याचा अंदाज घेणे कठीण झालं आहे.
Jalgaon Crime: विवाहित महिलेशी अनैतिक संबंध, 30 वर्षीय सागरवर धारदार शस्त्रांनी वार; हल्ल्यात जागीच सोडला जीव!
ओळख पटवण्याचं आव्हान
पोलीस तपासात मृतदेहाजवळ ओळख पटेल अशी कोणतीही वस्तू किंवा कागदपत्रे आढळली नाहीत. मृतदेहाच्या अंगावर असलेले कपडे आणि शारीरिक ठेवण पाहता, त्या व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 50 वर्षांदरम्यान असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अहवालातून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.
Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरात आता ५ नवे पोलीस स्टेशन्स, वाचा संपूर्ण यादी
पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
पोलिसांनी परिसरातील सर्व नागरिक, सरपंच आणि पोलीस पाटील यांना आवाहन केलं आहे की, ज्या कोणाच्या कुटुंबातील किंवा परिसरातील व्यक्ती बेपत्ता असेल आणि ज्याचे वर्णन मृतदेहाशी जुळत असेल, त्यांनी तातडीने चकलांबा पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. या घटनेमुळे तिंतरवणीसह शिरूर कासार तालुक्यात भीतीचं वातावरण पसरलं असून, या व्यक्तीच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
