Mumbai Weather News : मुंबईत तापमानात घट झाली आहे. शुक्रवारी नोंदवण्यात आलेलं किमान तापमान गेल्या पाच वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचं नीचांकी होतं. मात्र दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक आहे. दुपारी तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं आहे.
मुंबईत दिवसा तापमानात वाढ, तर रात्री गारठा
कोकण विभागात सोमवारपासून पुन्हा किमान तापमान थोडे वर चढण्याचा अंदाज आहे. मात्र, पुन्हा काही दिवसांनी थंडीची एक लाट मुंबईकरांना अनुभवायला मिळू शकते. सध्या तरी या वर्षाच्या अखेरीस मुंबईत थंडी असेल का याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे सांगण्यात येत आहे.
Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी दुरुस्त करण्यास अंतिम संधी, ‘या’ तारखेपर्यंत चुका सुधारून घ्या…
मुंबई परिसरात आभाळ निरभ्र असल्याने सूर्यकिरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत आहे. त्यामुळे तापमानाचा पारा चढा आहे. त्याचवेळी रात्रीच्या वेळीही आकाश निरभ्र असल्याने ढगांच्या अनुपस्थितीत बाहेर जाणारे दीर्घतरंग विकिरण जमिनीला थंड करते, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. याच कारणामुळे दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात मुंबईत मोठा फरक जाणवत असल्याचे त्या म्हणाल्या.
कमाल तापमान चढेच
मुंबईमध्ये किमान तापमानाचा पारा उतरला असला तरी कमाल तापमान अजूनही चढे आहे. शुक्रवारी कुलाबा येथे ३३, तर सांताक्रूझ येथे ३२.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईमध्ये पश्चिमी प्रकोपाचा प्रभाव पडल्याशिवाय आणि हिमालयीन भागामध्ये हिमवृष्टी झाल्याशिवाय मुंबईचे कमाल तापमान सध्या तरी उतरण्याची शक्यता फारशी नाही. त्यामुळे किमान तापमान जरी उतरलेले असले तरी कमाल तापमान चढे असल्याने ही तापमान तफावत कायम राहण्याची शक्यता आहे.
