• Sat. Jun 6th, 2026
    Pune Crime : ‘चल तुला शाळेत सोडतो…’ तरुणीला दुचाकीवरुन नेत दुष्कृत्य, घटनेने पुण्यात खळबळ

    Pune Crime News : पुण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन तरुणाने मुलीला शाळेत सोडण्याच्या बहाण्याने घृणास्पद प्रकार केला. पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अभिजित दराडे, पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता पुणे शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. विश्रांतवाडी भयंकर प्रकार घडला आहे. एका 17 वर्षीय मुलीवर जबरदस्ती अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं असून जेलमध्ये टाकलं आहे.

    बसस्टॉपवर ओळख नंतर अल्पवयीनसोबत दुष्कृत्य

    या प्रकरणातील नराधम आरोपीचं नाव मुनाकिब नासिर अन्सारी असं आहे. मुनाकिब हा महाविद्यालयीन विद्यार्थी असल्याचं तपासात समोर आलं आहे. घटनेआधी मुलीची आणि आरोपीची ओळख काही काळापूर्वी बस स्टॉपवर झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू होता.
    Maharashtra Timesसिद्धेश्वर एक्सप्रेसमधून साडे पाच कोटींचं सोनं गायब, एसी फर्स्ट क्लासमधून कल्याणदरम्यान घटना उघडकीस; नेमकं काय घडलं?

    शाळेत सोडण्याच्या बहाण्याने दुसरीकडेच नेलं

    4 डिसेंबर रोजी आरोपीने मुलीला शाळेत सोडण्याचं कारण सांगत तिला दुचाकीवर बसवलं. मात्र, शाळेत न नेता एका एकांत परिसरातील खोलीत घेऊन गेला. तिथे जाऊन त्याने मुलीवर जबरदस्ती केली. अशी माहिती मुलीच्या नातेवाईकांनी नमूद केलेल्या फिर्यादीत दिली आहे.
    Maharashtra TimesMaharashtra Weather : राज्यात थंडीचा कडाका वाढला, IMD चा यलो अलर्ट; पुढील काही दिवस कसं असेल हवामान?

    घटनेनंतर परिसरात संतापाची लाट, पुण्यातील घटनेने खळबळ

    घडलेला प्रकार समजताच मुलीच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर विश्रांतवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला काही वेळातच अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणानंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेसंदर्भात अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

    आता नाही तर कधीच नाही, नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गे करा; सत्यजीत तांबे अंदोलन उभारणार

    दरम्यान, पुण्यात मागील काही वर्षापासून हत्या, हाणामारीसारख्या अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भररस्त्यात चाकूहल्ले, अपहरण, हत्येच्या घटना सर्रास समोर येत आहेत. या सततच्या घटनांनंतर पोलिसांचा अशा गुंडावर काही वचक राहिला आहे की नाही असाच प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा