लातूरमध्ये एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका कॅफेत अल्पवीयन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघा जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत जागा उपलब्ध करून दिली म्हणून गुन्हा दाखल केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ऋषिकेश होळीकर, लातूर : राज्यामध्ये महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. अशीच एक घटना लातूर जिल्ह्यात उघड झाली आहे. कॅफेच्या नावाखाली लॉजिंग चालवण्याचा आरोप लावत दोन जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक बातमी समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीसह दोन कॅफेचालकांना सुद्धा अटक केली असल्याची माहिती आहे. संबंधित कॅफेचालकांनी आरोपीवर मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता, अटक झालेल्या आरोपींची चौकशी करून पुढील तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. संबंधित घटना ही 4 डिसेंबर रोजी उघडकीस आली.
पीडितेला फूस लावून पळवून नेलं अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांच्या तपासादरम्यान, रिहान गुलाब शेख (18) नावाच्या एका तरुणाने पीडितेला फूस लावून पळवून नेल्याचं समोर आलं. त्यानंतर, तिच्यावर आरोपीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आले.
पीडितेवर कॅफेत लैंगिक अत्याचार
तसेच, मुलीवर अत्याचार करण्यासाठी तिला शहरातील कॅफे डेली ग्राइंड आणि एस. पी. कॅफे डेअर याठिकाणी नेण्यात आल्याचं निष्पन्न झालं. ही माहिती समोर येताच पोलिसांनी सूरज राजेश ढगे आणि अनिकेत अजय कोटुळे या कॅफेचालकांना ताब्यात घेतलं. या दोघांवर सुद्धा पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचं महत्त्वाचं आवाहन
या प्रकरणातील मुख्य आरोपी रिहान शेख याला पोलिसांनी 4 डिसेंबर रोजी अटक केली आहे. त्याच्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळवण्यात आली. तसेच, या घटनेतील इतर दोन आरोपी असलेल्या कॅफेचालकांना 5 डिसेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. न्यायालयाकडून 8 डिसेंबरपर्यंत पीसीआर मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे.
याव्यतिरिक्त, अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या तसेच आरोपींना कोणत्याही प्रकारे मदत करणाऱ्या कॅफे, लॉज किंवा हॉटेल मालकांवर पोक्सो अॅक्ट अंतर्गत करवाई केली जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा