• Tue. Mar 10th, 2026
    Amba Ghat Bus Accident : नेपाळहून कोकणात कामाला निघाले, सर्वजण साखरझोपेत, भरधाव बस 100 फूट खोल दरीत कोसळली; अंबा घाटात भीषण अपघात

    Amba Ghat Bus Accident : रत्नागिरी आणि कोल्हापूर शहराला जोडणाऱ्या अंबा घाटात एखा खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात कुणाचाही मृत्यू झालेला नाही.

    रत्नागिरी अंबा घाट खासगी बस दरीत कोसळली(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    रत्नागिरी/कोल्हापूर : राज्यात अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. तसेच या अपघातांमध्ये मृत्यूचं प्रमाण देखील वाढत आहे. असाच एक भीषण अपघात अंबा घाटात आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास झाला आहे. हा अंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या शहरांना जोडतो. याच घाटात एका खासगी बसचा अपघात झाला आहे. मध्यप्रदेश पासिंग असलेली ही खासगी बस तब्बल 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली आहे. यात असलेले सर्व प्रवासी नेपाळवरुन आले होते. ते रत्नागिरीतल्या अंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    दरम्यान, बसमधील 15 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जिवितहानी झालेली नाहीय. अपघात होताच तात्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. आज भल्यापहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    (सविस्तर बातमी अपडेट होत आहे…)

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत संजय पाटील २०१९ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये सिनीयर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील ग्रामीण भागातील बातम्या, राजकीय बातम्यांची आवड, हायपरलोकल बातम्या, क्राइम बातम्या अर्थात विशेष घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सतत प्रयत्न असतो. गावाखेड्याकडच्या बातम्या, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी थोडक्यात न्यूज पोर्टल, आधान न्यूज पोर्टल, महाराष्ट्र टाइम्स डिजिटल आणि सकाळ मीडिया ग्रुप या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून पुण्यातील गरवारे महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा