सक्षम ताटे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. आंचल मामीडवार हिने घर का सोडलं? याबाबत धक्कादायक दावा केला आहे. तिने सक्षमच्या भावावर चुकीचं वर्तन करण्याचा आणि वाईट हेतूने स्पर्श करण्याचा गंभीर आरोप केला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नांदेड : देशभर गाजलेल्या नांदेडमधील सक्षम ताटे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. प्रेमसंबंधातून जुन्या शहरातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार हिने सक्षमच्या मृतदेहासोबत विवाह करून त्याच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अलीकडे आंचल सक्षमच्या घरातून निघून गेल्याची माहिती समोर आल्यानंतर समाजमाध्यमांवर तिच्याविरोधात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आणि ट्रोलिंग सुरू झाले होते. यानंतर आंचल मामीडवार हिने पुढे येत या प्रकरणाबाबत काही धक्कादायक दावे केले आहेत.
आंचलच्या म्हणण्यानुसार, सक्षमचा भाऊ तिच्यासोबत अयोग्य वर्तन करत होता. तसेच वाईट हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळेच आपण सक्षमच्या घरातून बाहेर पडून आपल्या आजीकडे राहण्यासाठी गेल्याचे तिने सांगितले. तसेच, सक्षमच्या वडिलांचा मृत्यू हा आजारपणामुळे झाल्याचेही तिने स्पष्ट केले. यासोबतच, समाजमाध्यमांवर तिच्याबाबत होत असलेल्या टीका आणि ट्रोलिंगबाबत नाराजी व्यक्त करत, सत्य परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणावरही आरोप करू नयेत, असे आवाहनही आंचल मामीडवार हिने केले आहे.
आंचल मामीडवार नेमकं काय म्हणाली?
“मी प्रामाणिकपणे त्यांच्या घरी गेले होते. मी त्यांना वचनही दिलं होतं. त्यांचं म्हणणं एकदम बरोबरही आहे. पण सक्षमचा भाऊ माझ्यासोबत बरोबर वागत नव्हता. त्याचे माझ्याबाबत बॅड इंटेशन होते. तो मला टच करत होता. मी त्याच्या मम्मीला सांगितलं. त्याच्या मम्मीला आणि अंकलला सांगितलं. पण ते माझ्यावर विश्वास करत नव्हते. मग एकेदिवशी मी विचार केला की, एवढं सांगितल्यानंतरही त्यांना विश्वास होत नाही, मग पुढे जाऊन काही चुकीचं घडलं तर ते काय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवतील? त्यामुळे मी माझ्या घरी निघून आले आहे”, असा खळबळजनक दावा आंचलने केला.
“ते बोलत आहेत की, मी त्यांच्या घरुन पळून आली आहे किंवा आजीच्या तब्येतीचा बहाणा करुन आली आहे. तर असं काहीच नाही. एसपी सरांना सुद्धा माहिती आहे आणि अॅडीशनल एसपी अर्चना पाटील यांना सुद्धा माहिती आहे की, मी या कारणास्तव माझ्या घरी आले आहे. सक्षमचा भाऊ मला त्रास देत होता. माझ्यासोबत चुकीचं वागत होता”, असा आरोप आंचलने केला.
“मी पोलिसांच्या परवानगीने माझ्या घरी आलेली आहे. सक्षमची मम्मी मला सोडायला आली नव्हती. स्वत: पोलीस कर्मचारी मला तिथे सोडायला आले होते. माझ्या घरी त्यांनी मला माझ्या आजीच्या हवाली केलं. सक्षमच्या मम्मीचं म्हणणं आहे की, मी माझ्या काकांच्या दबावात येऊन किंवा कांकाच्या संपर्कात होते म्हणून मी माझ्या घरी परतले. असं काही नाही. मी सज्ञान आहे. मी स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकते. मला तिकडे त्रास होत असल्यामुळे मी माझ्या घरी निघून आले आहे”, असादेखील आरोप तिने केला.
“माझं आजही सक्षमवर प्रेम आहे. मी व्यक्त करु शकत नाही. मी त्याच्यावर खूप केलेलं आहे. पण त्याच्या घरच्यांनी माझ्यासोबत नीट वागायला पाहिजे होते. मी त्याच्यावर प्रेम करत नसते तर एवढं मीडियासमोर बोललेच नसते”, असं आंचलने स्पष्ट केलं.
“त्यांनी माझ्याबद्दल फेक न्यूज दिली. मला बदनाम करत आहेत. ते म्हणतात की, मी घर सोडून पळून गेली, बेपत्ता झाली. पण मी माझ्या वडिलांच्या घरी आले आहे. कुणाच्या दबावाखाली आलेली नाही. मी मीडियासमोर असं सांगणार नव्हते की, सक्षमचा भाऊ माझ्यासोबत चुकीचा वागला. पण त्यांनी काल जी फेक न्यूज दिली त्यामुळे मी स्वत:ला रोखू शकले नाही”, अशी भूमिका आंचलने व्यक्त केली.
“ते बोलत आहेत की, सक्षमच्या वडिलांचा मृ्त्यू माझ्यामुळे झाला वगैरे. पण सक्षम जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या जेलमध्ये होता तेव्हाच त्याच्या वडिलांची तब्येत ढासळली होती. मी समजू शकते की, त्यांचा मुलगा गेला याचं त्यांना दु:ख होतं. पण तुम्ही त्यांचे मेडिकल रिपोर्ट पाहू शकतात, ड्रींक करुन त्यांची पूर्ण इंटेस्टाईन खराब झाले होते. त्यामुळे त्यांना जेवण जात नव्हतं. ते जवत नव्हते. त्या कारणाने त्यांचा मृत्यू झाला”, असा खुलासा आंचलने केला.
“सक्षमच्या आईने मला असं बदनाम करु नये. लोकं खूप वाईट कमेंट करत आहेत. लोकांना माहिती नाही की, माझ्यासोबत काय घडलं, त्याचा भाऊ माझ्यासोबत कसा वागत होता. त्यांची बहीण माझ्या जागी राहिली असती तर त्यांनी तिला राहू दिलं असतं का? तिने घरी येण्याचा निर्णय घेतला असता तर असं बदनाम केलं असतं का? एवढंच बोलायचं आहे. मला जे योग्य वाटलं तो निर्णय मी घेतला. मी एवढं करुन सुद्धा माझ्या घरच्यांनी मला परत घरात घेतलं. मी आता आजीसोबत राहतेय. माझं एवढंच मागणं आहे की, वस्तुस्तिथी जाणून घेतल्याशिवाय वाईट कमेट करु नका. तुमच्याही घरी बहिणी असतील. त्यामुळे प्लीज विचार करुन कमेंट करत जा”, असं आवाहन आंचलने केलं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा