• Mon. Mar 9th, 2026
    Ratnagiri News: काळ आला होता पण वेळ नाही! मिनीबसचा विचित्र अपघात; रिव्हर्स घेताना पलटी झाली, 10 जण…

    पुण्याहून रत्नागिरीला पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची मिनीबस हर्णे बायपासवर उलटली. या भीषण अपघातात १० पर्यटक जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे येथील पर्यटकांना घेऊन जाणारी एक मिनीबस रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बायपासवर उलटल्याने १० जण जखमी झाले. आज दुपारी १२ ते १२:३० च्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेल्या पुणेकरांवर दुर्दैवी प्रसंग ओढवला. दापोली तालुक्यात हर्णे बायपास मार्गावर हा भीषण अपघात घडला. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथून आलेली MH 14 GU 1616 क्रमांकाची मिनीबस पर्यटकांना घेऊन जात होती. आज दुपारी साधारणपणे १२ ते १२:३० च्या दरम्यान, बस एका हॉटेलमधून बाहेर पडून घरी परतण्यासाठी निघत होती. त्यावेळी चालकाने बस रिव्हर्स घेताना त्याचा अंदाज चुकला. बसचा तोल इतका सुटला की ती थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. बस पलटी होताच आतमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले.

    या अपघातात एकूण १० पर्यटक जखमी झाले. काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या, तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमींमध्ये क्षितीज अशोक गुगणे (३५), आरोही पराग गायकवाड (४), पराग पर्शुराम गायकवाड (४०), नेहा पराग गायकवाड (३५), हितेश रमेश चौधरी (४०), ओजस अक्षय कुलकर्णी (५१), सुरेश साहेबराव कुचेकर, महेश दत्तात्रय वाघमारे (३९), प्राजक्ता महेश वाघमारे (३६) यांचा समावेश आहे. हे सर्वजण पिंपरी चिंचवड येथील रहिवासी आहेत.

    Maharashtra TimesAmaravati News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेकडून मुंबईसाठी विशेष गाड्यांची घोषणा

    अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने हालचाल केली. जखमींना तात्काळ उपचारासाठी आसूद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार दिल्यानंतर, अधिक उपचारांसाठी त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.

    या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचून पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे हर्णे बायपासवरील पर्यटनस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा