Nashik Scam News :नाशिक जिल्ह्यात म्युल अकाउंट्सचे मोठे जाळे सायबर पोलिसांनी उघड केल.पोलिस ठाण्यात ९० बँक खातेदारांविरोधात एकूण सहा गुन्हे दाखल झाले आहेत.तर जिल्ह्यात एक कोटी ५८ लाखांचे व्यवहार झाले.
शहरात ८६ आणि ग्रामीण भागात ४ अशी एकूण ९० मुल्य खाती शोधण्यात आली
तपासादरम्यान या खात्यांमधून एक कोटी ५१ लाख ४७ हजार २५७ रुपयांचे संशयास्पद व बेकायदेशीर व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. सायबर संशयित हे पार्टटाइम जॉब, कमिशन, शेअर मार्केटमधील गुंतवणूक किंवा सहज पैसे कमवण्याचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढतात. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यांचे तपशील मिळवून, फसवणुकीची रक्कम या खात्यांमध्ये जमा केली जाते. तिथून हे पैसे पुढे फिरवण्यासाठी ‘म्युल खात्यांचे’ जाळे वापरले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिक शहरात ८६ आणि ग्रामीण भागात ४ अशी एकूण ९० ‘म्युल’ खाती शोधण्यात आली आहेत.
बँक खाते भाडेतत्त्वावर!
सायबर गुन्ह्यांमध्ये ज्यांच्या खात्यावर संशयास्पद पैसे जमा होतात. त्यांनाही कायदेशीर नियमांनुसार गुन्ह्यात संशयित मानले जाते. त्यामुळे केवळ किरकोळ ‘कमिशन’च्या आमिषाने किंवा अजाणतेपणाने बँक खाते, एटीएम कार्ड, यूपीआय पिन अथवा सीमकार्ड अनोळखी व्यक्तींना वापरण्यास देणे हा गंभीर अपराध आहे. अशा सहभागी खातेदारांवर पोलिस कारवाई करीत आहेत.
Farmer Loan Waiver 2026 : बळीराजासाठी सुखकर बातमी! कर्जमुक्तीला अखेर सुरुवात, लाभार्थींची प्रातिनिधिक यादी जाहीर; किती लाख जमा होणार?
म्युल खाते म्हणजे काय
‘म्युल’ या शब्दाचा अर्थ ‘ओझे वाहणारा’ असा होतो. सायबर संशयित स्वतःची ओळख लपवण्यासाठी आणि गुन्ह्यांमधील रक्कम इतरत्र वळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या बँक खात्याचा वापर करतात. ऑनलाइन फ्रॉड, डिजिटल अरेस्ट किंवा टास्क फ्रॉडद्वारे चोरलेले पैसे थेट स्वतःच्या खात्यात न घेता, संशयित ते पैशांचे ‘ओझे’ वाहण्यासाठी सामान्य नागरिकांच्या बँक खात्यात (म्युल खाते) जमा करतात. तेथून ही रक्कम इतर खात्यांमध्ये वर्ग करून क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवली जाते किंवा एटीएमद्वारे रोख स्वरूपात काढली जाते.
म्युल बँक खाते काय काम करते
. सायबर चोर टास्क फ्रॉड,शेअर मार्केट स्कॅम किंवा इतर ऑनलाईन फसवणुकीद्वारे लोकांचे पैसे चोरतात
. हे चोरीचे पैसे थेट खात्यात न घेता ते मनी म्युल खात्यात ट्रान्सफर केले जातात
.या म्युल खात्याद्वारे तपास भटकतोसुद्धा कारण जेव्हा पोलिस तपास करतात तेव्हा सायबर चोराऐवजी त्या बँक खातेदारकाचे नाव समोर येते ,ज्याचे ते खाते आहे.
Mumbai AC Local: एसी लोकलचे दरवाजे लॉक, ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड; कल्याण-CSMT लोकलमध्ये तांत्रिक बिघाड
म्युल बॅँक खात्यासाठी लोकांची केली जाते फसवणूक
वर्क फ्रॉम होमघरी बसून ट्रान्झॅक्शन करा आणि पैसे कमवा ,पार्ट टाइम नोकऱ्यांच्या फसव्या जाहिराती काढून लोकांना फसवले जाते. काही गरीबांना किंवा आर्थिक गरज असणाऱ्या विद्यार्थांना कंपनीच्या कामासाठी आम्हाला तुमचे खाते हवे आहे. व याचे आम्ही तुम्हाला महिना काही हजार रूपये देऊ असे सांगून त्यांचे एटीएम आणि पासबुक घेतले जाते. काही वेळा तर तुमच्या खात्यात पैसे येतील तुम्ही ते काढून आम्हाला द्या आणि तुमचे १००% कमिशन ठेवा अस देखील सांगितल जातं.
