NMIA Passenger Trial: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (NMIA) २९-३० नोव्हेंबर रोजी यशस्वी प्रवासी चाचणी पार पडली. २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्यापूर्वी ही एक महत्त्वाची तयारी आहे.
NMIAने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी बनवून ही चाचणी करण्यात आली होती. यावेळी विमानतळावरील सर्व महत्त्वाच्या प्रक्रियांची तपासणी करण्यात आली. प्रवाशांचे चेक-इन, सुरक्षतपासणी, बोर्डिंग प्रक्रिया आणि बॅगेज क्लेमपर्यंत संपूर्ण प्रक्रियेचे ट्रायल रन करण्यात आले होते.
नवी मुंबई विमानतळ ‘टेक ऑफ’साठी रेडी! एका महिन्यात उड्डाणांना सुरूवात; विमान सेवांची सविस्तर माहिती पाहा
नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 ऑक्टोबर रोजी झाले होते. हा देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड विमानतळ असून 19,650 कोटी रुपये खर्च करून विकसित करण्यात आला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (CSMIA) प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यास हा विमानतळ मोठी मदत करेल, अशी अपेक्षा आहे.
पोस्ट शेअर केली
एक्स वर पोस्ट करत, NMIAने लिहिले, “25 डिसेंबरपासून उड्डाणांना सुरुवात करण्याच्या तयारीत आम्ही लवकरच तुम्हा सर्वांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत! आमच्या ORAT टीमने शेकडो सिम्युलेटेड प्रवाशांसह आमची पहिली प्रवासी चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केली. इंडिगो, अकासा आणि एअर इंडिया एक्स्प्रेससोबत चेक-इनपासून ते सुरक्षा, बोर्डिंग आणि बॅगेज रीक्लेमपर्यंत, प्रत्येक टप्प्याची परिपूर्ण चाचणी झाली. आमच्या “पहिल्या प्रवाशांना”, CISF, L&T, आमचे एअरलाइन पार्टनर्स आणि NMIALच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.”
आपल्या पिढीसाठी एकच विचार भाजपचं १०० टक्के सरकार; डोबिंवलीत रविंद्र चव्हाणांची फिल्डिंग!
अकासा एअर, इंडिगो आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या विमान कंपन्या 25 डिसेंबर 2025 पासून NMIAवरून उड्डाणे सुरू करणार आहेत. या उड्डाणांच्या सुरूवातीमुळे नवी मुंबई विमानतळ दिल्ली, गोवा, कोची, अहमदाबाद, लखनौ इत्यादी शहरांशी थेट हवाई संपर्क उपलब्ध करून देणार आहे. 1,160 हेक्टरमध्ये पसरलेला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई महानगर प्रदेशासाठी दुसरा प्रमुख एव्हिएशन हब ठरणार आहे.
